बाराही तालुक्यांत एक नवा कोरोना रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:32+5:302021-02-05T06:56:32+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र, तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेष ...

बाराही तालुक्यांत एक नवा कोरोना रुग्ण नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र, तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे बाराही तालुक्यांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात चार आणि नगरपालिका क्षेत्रात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरामध्ये ४६३ जणांची तपासणी करण्यात आली असून, ८८५ जणांचे स्वॅब घेण्यात आले, तर ११४ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. ८२ जणांवर उपचार सुरू असून, १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, राजारामपुरी चौदाव्या गल्लीतील ६५ वर्षीय पुरुष, आजरा तालुक्यातील मासेवाडी येथील ४८ वर्षांचा पुुरुष आणि शुक्रवार पेठेतील ६१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.