क्षीरसागर-वरपे वाद: कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रश्न, पोलिस अधीक्षक म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:20 PM2023-12-14T13:20:36+5:302023-12-14T13:21:53+5:30

वरपे यांची फिर्याद नोंदवून घेतली नसल्याने उलटसुलट प्रश्न

There is no pressure on the police in the Kshirsagar-Varpe dispute says Superintendent of Police Mahendra Pandit | क्षीरसागर-वरपे वाद: कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रश्न, पोलिस अधीक्षक म्हणाले..

क्षीरसागर-वरपे वाद: कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रश्न, पोलिस अधीक्षक म्हणाले..

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांचे शेजारी राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांच्यातील वादाच्या चौकशीत पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन्हीकडील तक्रार अर्जानुसार प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलाच्या टेरेसवर शुक्रवारी (दि. ८) सुरू असलेल्या जेवणावळीवरून माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे शेजारी राजेंद्र वरपे यांच्यात वाद झाला होता. क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने मारहाण केल्याची तक्रार वरपे यांनी केली होती, इमारतीमधील रहिवासी वरपे यांचा तक्रार अर्ज घेतला. वरपे यांची फिर्याद नोंदवून घेतली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रश्न उपस्थित केले जात होते. 

याबाबत विचारणा केली असता, या वादाच्या चौकशीत पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचे अधीक्षक पंडित यांनी स्पष्ट केले. दोन्ही अर्जांची चौकशी सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले जात आहेत. दोन जबाब नोंदविले आहेत. इतरांचेही जबाब नोंदविले जातील. लवकरच इमारतीमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले जाईल. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर दोषींवर पुढील कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

खासगी सावकारांविरोधात तक्रारी द्या

विनापरवानगी खासगी सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी कानावर येतात. परंतु, लेखी तक्रारी येत नाहीत. खासगी सावकारांनी अतिरिक्त व्याज वसुली केल्याच्या तक्रारी नागरिकांनी द्याव्यात. त्यानुसार खासगी सावकारांवर तातडीने कारवाया केल्या जातील, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.

Web Title: There is no pressure on the police in the Kshirsagar-Varpe dispute says Superintendent of Police Mahendra Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.