शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याहून सातारला येताना अजून एक बोगदा हवा

By admin | Updated: July 29, 2014 23:02 IST

नितीन गडकरींकडे उदयनराजेंची मागणी

सातारा : पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे कामास अवास्तव विलंब होत आहे, रस्त्याची कामे प्रमाणित नमुन्यापेक्षा हलक्या दर्जाची होत आहेत. त्यामुळे पुणे-सातारा या महामार्गावरील प्रवासाचा प्रवाशांना वीट आला आहे. या कामात युद्धपातळीवर सुधारणा होण्याची कडक उपाययोजना करावी. खंबाटकी घाटात पुण्यावरून येताना आणखी एक बोगदा नव्याने बांधण्यात यावा, या मागण्यांसह मुंबई-बेंगलोर कॉरिडॉर होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील कामांसाठी नागरिकांतून उद्रेक होण्याची वाट महामार्ग प्राधिकरण पाहत आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी अपेक्षावजा मागण्या केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या.उदयनराजे यांनी महामार्गाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे उदयनराजे भत्तेसले यांच्या समवेत गडकरी यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी उदयनराजे यांनी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत खेद व्यक्त करीत या कामांचे वाभाडे काढले. बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चेअरमन आर. पी. सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे महाराष्ट्र प्रकल्पांचे प्रमुख सुधीरकुमार, अशोकराव सावंत हे उपस्थित होते. खासदार उदयनराजे यांनी मंत्री गडकरींना वस्तुस्थिती निदर्शनास आणून देताना उदयनराजे म्हणाले, महामार्गावर सुरू असलेली कामे हीन दर्जाची होत आहेत. कामे सुरू असल्याबाबत कोठेही दिशादर्शक किंवा सावधानतेचे फलक नाहीत. सहापदरीकरणाच्या विलंबाने सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. खंबाटकी घाटामध्ये नवीन बोगद्याची गरज आहे. साताराहून पुण्याला जाताना बोगदा असल्याने, वेळेची व खर्चाची बचत होत आहे. परंतु पुण्याहून सातारकडे येण्यासाठी घाटाचाच रस्ता सुरू आहे. तेथे घाटाऐवजी नवीन बोगदा आवश्यक आहे. त्यामुळे अपघात व वेळ-खर्च वाचणार आहे. याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)-केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नतीन गडकरी यांनी महामार्गाच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच नवीन बोगदा निर्माण करण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणेची बैठक आयोजित केली जाईल. अधिवेशन संपताच १५ दिवसांत ही बैठक आयोजित करून त्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन खासदार उदयनराजे यांना दिले