शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुष्पहार घालून मिरवणूक काढणार

By admin | Updated: November 23, 2015 00:28 IST

प्रज्ञा पोतदार : शौचालययुक्त मोहीम सुरूच; ३४ जणांवर दंडात्मक कारवाई

इचलकरंजी : शहर पूर्णपणे शौचायलयुक्त होण्याच्या मोहिमेंतर्गत रविवारी ३४ जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आज, सोमवारपासून ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने पुष्पहार घालून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.नगरपालिका प्रशासनाने पालिका हद्दीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यांची मिरवणूक काढून त्यांना दंडही केला जातो. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला असून, पे अँड युज शौचालयांना गर्दी वाढू लागली आहे. तसेच वैयक्तिक शौचालयास बांधणीसाठी अनुदान मागणीचे अर्जही पालिकेकडून घेतले जात आहेत.मोहीम राबविताना काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत, तर सार्वजनिक शौचालयांची पडझड झाली असून, काही शौचालयांत व आवारात घाणीचे साम्राज्य आहे, अशा तक्रारीही येऊ लागल्या आहेत. त्या ठिकाणी पाहणी करून ती शौचालये युद्धपातळीवर दुरुस्त केली जातील, असेही अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)यंत्रमाग कारखान्यांकडे कामगारांसाठी--शौचालये असणे अत्यावश्यकइचलकरंजीतील वस्त्रोद्योगामुळे येथे सुमारे बारा हजार कारखाने आहेत. त्यापैकी बहुतांश कारखान्यांकडे शौचालये नसल्याचे आढळून आले आहे. अशा कारखान्यांतील कामगार रात्री उघड्यावर शौचास बसल्याचे निदर्शनात आले आहे. तरी कारखान्यांकडे ताबडतोब शौचालये बांधून घेण्याविषयी नगरपालिकेच्यावतीने नोटिसा दिल्या जाणार आहेत.बांधकाम कामगारांनाही शौचालये द्यावीत---शहराच्या हद्दीत अनेक ठिकाणी नवीन इमारतींसाठी बांधकामे सुरू आहेत. त्यांचे कामगार इमारतीजवळच तात्पुरता निवारा करून राहतात. त्यांच्यासाठीही तात्पुरत्या शौचालयाची सोय संबंधित कंत्राटदार किंवा इमारत मालकाने करून द्यावी. यासाठी आज, सोमवारी शहरातील कंत्राटदारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले.