शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

...तर आंदोलनाचे हत्यार उपसू

By admin | Updated: November 27, 2014 00:50 IST

इंदूलकर : परमिटप्रश्नी तीन आसनी रिक्षा वाहतूक समितीची निदर्शने

कोल्हापूर : विविध कारणांस्तव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुमारे साडेतीन हजार परमिट केवळ ‘कॅन्सल’चा शिक्का मारून रद्द केली आहेत. ही कारवाई चुकीची असून, परमिटधारकांची सुनावणी घेणे कायद्याने बंधनकारक असताना असा चुकीचा निर्णय घेतला. याबद्दल आज, बुधवारी तीन आसनी रिक्षा वाहतूक कल्याण समितीच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने केली. याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी दराडे यांना जाब विचारला. शहरातील साडेतीन हजार रिक्षाचालकांचे परमिट केवळ ‘कॅन्सल’ असा शिक्का मारून रद्द केली. परमिटधारकांची सक्षम अधिकाऱ्यासमोर सुनावणी घेणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र, परिवहन कार्यालयाने परमिट थेट रद्द केली. याशिवाय रिक्षा व्यवसाय कोलमडला आहे. याबाबतचा सवालही आंदोलनकर्त्यांच्यावतीने बाबा इंदुलकर यांनी अधिकारी लक्ष्मण दराडे यांना केला. येत्या आठ दिवसांत प्रश्न निकाली काढले नाहीत तर आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशारा दिला. अधिकारी दराडे यांनी एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक बोलावू. तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवरही कारवाई करू. साडेतीन हजार परमिट कॅन्सल केले आहेत. त्यांच्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयातून अधिकारी बोलावण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. यावेळी राजू जाधव, मोहन बागडी, सुभाष शेटे, राजू शाहीर, शरफुद्दीन शेख, दिलीप मोरे, ईश्वर चांदणे, आदी उपस्थित होते. चक्क कायद्याचे पुस्तकच आणलेआंदोलनकर्ते बाबा इंदुलकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांबरोबर कायद्याच्याच भाषेत बोलण्यासाठी २०१३-१४ च्या ‘व्हेईकल अ‍ॅक्ट’चे पुस्तकच आंदोलनादरम्यान आणले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही उत्तर देताना काळजीपूर्वक द्यावे लागत होते. आंदोलकांमध्ये या पुस्तकाचीच चर्चा अधिक दिसत होती.