शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा म्हणते १६५ कोटींची थकबाकी; कोल्हापूर महापालिकेचा ३० कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:01 IST

कायदा धाब्यावर बसविला..

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता पंचगंगा नदीतून उपसा केलेल्या पाण्याची थकबाकी १६५ कोटी असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे, तर महापालिका पाणीपुरवठा विभागाने तडजोडीअंती ३० कोटींचा थकबाकी द्यायचे ठरले होते, असा दावा केला आहे.

शुक्रवारी पाणीपुरवठा खंडित करण्याला २०१९ ते २०२५ या सालातील पाणीपट्टी आकारणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या काळात महापालिका व जलसंपदा विभागाने करार केला नव्हता. आता तो करण्यात आला आहे. ७६.६४ मिलियन क्युबिक मीटर इतका नदीतून उपसा करण्याचा कोटा दिला होता. परंतु महापालिका पाणीपुरवठा विभागाने ५५ मिलियन क्युबिक मीटर उपसा केल्याचा जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी दावा केला आहे.

जेवढे पाणी उपसा केले आहे, तेवढीच पाणीपट्टी आकारा अशी भूमिका महापालिकेने घेतली, तर जेवढा मंजूर कोटा आहे तेवढी पाणीपट्टी जलसंपदा विभागाने आकारली आहे. परंतु ही आकारणी महानगरपालिकेने मान्य केलेली नाही. यातून तोडगाच न निघाल्यामुळे थकबाकी वाढत गेली. तरीही आतापर्यंत १४ कोटी ४० लाख रुपये जलसंपदाकडे भरले आहेत. दहा कोटी यावर्षी दिले जाणार आहेत.

जलसंपदा विभागाकडून महापालिकेला घरफाळ्याची सात कोटी २४ लाख रुपये तर पाण्याची थकबाकी ३ कोटी ३३ लाख रुपये येणे आहे. ही रक्कमही समायोजित करा, असे आम्ही जलसंपदा विभागाला सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही, असे घाटगे यांनी सांगितले.

कायदा धाब्यावर बसविला..

महापालिकेला १६५ कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावे लागतात. थकबाकी भरण्याबाबत महापालिकेला वारंवार नोटिसा देऊन, समक्ष भेटूनही त्यांनी रक्कम भरली नाही. तसेच कोणताही सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला नाही. मार्चअखेर असल्याने मंत्र्यांच्या सूचनेनुसार थकबाकीसाठी कारवाई करावी लागली. तर कायदा धाब्यावर बसवून थकबाकीबाबत महापालिकेने नोटीस न देता कारवाई केली, हे चुकीचे असल्याचे स्मिता माने यांनी सांगितले.

मंगळवारी एकत्र बैठक घेणार

हा सगळा प्रकार घडत असताना आयुक्त के. मंजुलक्ष्मी या रजेवर होत्या. त्यांच्याशी आदिल फरास यांनी संपर्क साधून यातून मार्ग काढावा लागेल असे सांगितले. तेव्हा आयुक्तांनी जलसंपदा विभागाने आकारलेली थकबाकी आपणाला मान्य नसल्याचे फरास म्हणाले. महापौर रुपाराणी निकम यांनी मंगळवारी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतले जातील, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Resources Dept Claims ₹165 Crore Dues; Corporation Disagrees.

Web Summary : Water Resources Department claims Kolhapur Municipal Corporation owes ₹165 crore in water dues. The Corporation disputes this, citing a prior agreement for ₹30 crore. Disagreement over water usage and tariff calculations led to the dispute, with a meeting scheduled to resolve the issue.