शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: इचलकरंजीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरता ठरेना; घटक पक्षांच्या आकड्यांचा मेळ बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:06 IST

महायुती आणि शिव-शाहू दोन्हीकडे तिच परिस्थिती, इच्छुक गॅसवर

अतुल आंबी

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडे उमेदवारी मागण्यांसाठी भाऊगर्दी झाल्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरता ठरेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्य पक्षांसह घटक पक्षांनीही अधिक जागा मागणी केल्याने आकड्यांचा मेळ बसेना. महायुती आणि शिव-शाहू दोन्हीकडे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार सध्या गॅसवर आहेत.

इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नव्या इच्छुकांच्यात उत्सुकता वाढली आहे. परिणामी सर्वच पक्ष व स्थानिक आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. हीच गोष्ट पक्षश्रेष्ठींना मुख्य डोकेदुखी ठरली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्य पक्षाच्या तसेच घटक पक्षांसोबत आणि वरिष्ठ नेत्यांसोबत अशा बैठकांच्या फेºया सुरुच आहेत. परंतु आकड्यांचा मेळ बसताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुढे प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे, असे असतानाही उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले असल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे.

प्रत्येक प्रभागात ३० ते ४० जण इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. अनेकजण समाजमाध्यमांवर उमेदवारी मिळाल्याप्रमाणे जाहिरातबाजी करत आहेत. या सर्वांचा गोंधळ पाहता सर्वच प्रभागांतील मतदार बुचकळ्यात पडले आहेत. हा गेला की तो येतो, सर्वजण आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.            

शिव-शाहू आघाडीचे वेट अ‍ॅण्ड वॉच

शिव-शाहू आघाडीत घटक पक्ष व स्थानिक गटांबरोबर चर्चेच्या बैठका सुरुच आहेत. त्यामध्येही कोणत्या पक्षाला किती जागा द्याव्यात, याबाबतची आकडेमोड सुरु आहे. त्यात महायुतीकडे इच्छुकांची गर्दी मोठी असल्याने त्यातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातील काही प्रबळ उमेदवार आपल्याकडे उमेदवारी मागू शकतात. अशांना गळाला लावल्यास तगडे आव्हान देता येईल, याचीही चाचपणी सुरू आहे. त्यामुळे सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचची परिस्थिती दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Election: Seat Sharing Formula Stuck; Alliance Partners Disagree.

Web Summary : Ichalkaranji's municipal election faces seat-sharing deadlock as numerous aspirants crowd parties. Alliances struggle with allocation, creating uncertainty. Shiv-Shahu alliance adopts a wait-and-see approach, eyeing potential rebels for a stronger challenge.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती