कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत असणाऱ्या महायुतीमधील नेत्यांची महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या दोन-तीन दिवसात बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर, उपमहापौर पदासह कोणत्या पक्षाकडे कोणती पदे द्यायची, यावर चर्चा होणार आहे. जरी बैठक झाली तरी महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवारांची नावे सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी जाहीर करण्यात येणार आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आता महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. महायुतीत तीन पक्ष असल्याने ज्या पद्धतीने निवडणुकीत जागा वाटप झाले, त्याच पद्धतीने सत्तेतील पदांची वाटणीही करावी लागणार आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपसह शिंदेसेनेचाही आग्रह राहणार आहे. या दोन पक्षात महत्त्वाच्या पदासाठी जोरदार रस्सीखेच होईल.महापालिकेची निवडणूक होते न होते तोच जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. ज्या पद्धतीने महापालिकेवर सत्ता मिळविली, तशीच ती जिल्हा परिषदेवरही मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जागा वाटपात जास्त वाद न घालता जेथे शक्य आहे, तेथे एकमेकांची मदत घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील पदाबाबत चर्चा करायला वेळ मिळालेला नाही. परंतु आता चर्चा करण्याचे निरोप दिले गेले आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीतून माघारीची मुदत संपल्यानंतर आता नेते थोडे मोकळे झाले आहेत. म्हणून येत्या दोन-तीन दिवसांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची एक बैठक होणार आहे.
महापौर भाजपचेचमहायुतीत सर्वाधिक जागा २६ जिंकणाऱ्या भाजपला महापौरपद पाहिजे आहे. त्यांच्याकडून इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी आपले दावे करण्यास सुरुवात केली आहे. महापौरपद कोणाकडे जाणार, यावर अन्य पदांची वाटणी केली जाणार आहे. भाजपने महापौरपद मागितले तर उपमहापौरसह स्थायी समिती सभापतीपद हे शिंदेसेना सोडणार नाही.
राष्ट्रवादीचाही आग्रही दावाचार नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फेही सत्तेतील वाट्यासाठी आग्रह राहणार आहे. जागा वाटपात कमी जागा दिल्यानंतरही महायुती म्हणूनच राष्ट्रवादीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्तेतील वाटा देखील चांगलाच पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह राहण्याची शक्यता आहे.
Web Summary : Kolhapur's Mahayuti leaders will meet soon to discuss mayoral and deputy mayoral positions, aiming for power mirroring seat allocation. BJP vies for mayor, while Shinde's Sena eyes key posts. Names will be revealed Monday.
Web Summary : कोल्हापुर में महापौर और उपमहापौर पदों पर महायुति नेताओं की जल्द बैठक होगी, जिसका लक्ष्य सीट आवंटन के अनुसार सत्ता साझा करना है। भाजपा महापौर पद के लिए प्रतिस्पर्धा कर रही है, जबकि शिंदे सेना की नजरें प्रमुख पदों पर हैं। नाम सोमवार को घोषित किए जाएंगे।