Kolhapur ZP 2026: अध्यक्षपद राष्ट्रवादीला शक्य; पाटील, फराकटे, डोंगळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:16 IST2026-02-10T13:15:43+5:302026-02-10T13:16:14+5:30

मुश्रीफ यांचा शब्दच अखेरचा ठरणार, गडहिंग्लज तालुक्याला आजपर्यंत कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही.

The names of Shailaja Satish Patil, Shobhatai Farakte, and Amruta Dongle are being discussed by the NCP Ajit Pawar for the post of Kolhapur Zilla Parishad President | Kolhapur ZP 2026: अध्यक्षपद राष्ट्रवादीला शक्य; पाटील, फराकटे, डोंगळे चर्चेत

Kolhapur ZP 2026: अध्यक्षपद राष्ट्रवादीला शक्य; पाटील, फराकटे, डोंगळे चर्चेत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहातील पहिल्या अध्यक्षा म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार)कडून गिजवणे मतदारसंघातून निवडून आलेल्या शैलजा सतीश पाटील या प्रबळ दावेदार ठरू शकतात. पक्षाकडून या पदासाठी शोभाताई फराकटे, मानसी भोगण, अमृता डोंगळे, राजकुंवर गायकवाड या सदस्याही स्पर्धेत आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गातून निवडून आलेली सदस्या ही निवडणूक लढवू शकते.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने मंत्री हसन मुश्रीफ हे कोणत्याही स्थितीत अध्यक्ष आपल्याच पक्षाचा करणार हे स्पष्ट आहे. त्यांच्या चिन्हावर २० व शिरोळमधील निवडणूकपूर्व युती झालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीच्या ४ जागा विजयी झाल्या आहेत. भुदरगडला आघाडीतून निवडून आलेल्या रेश्मा देसाई या आपल्याच आघीडाच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचा आहे.

बहुमतासाठी ३५चा आकडा लागतो. त्यामुळे सत्तेसाठी त्यांना १० जागा कमी पडतात. ते महायुतीचे नेते असल्याने भाजप, शिंदेसेनेला सोबत घेऊन अध्यक्ष करू शकतात. कोल्हापूर महापालिकेत त्यांनी भाजप व शिंदेसेनेला सर्व मुभा दिल्याने जिल्हा परिषदेला मुश्रीफ आपला वरचष्मा ठेवतील हे स्पष्टच आहे.

गिजवणेच्या शैलजा पाटील या कागल विधानसभा मतदारसंघातील आहेत. शिवाय त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तरुण नेतृत्व असून, त्या बी. कॉम., बी. एड. झाल्या आहेत. साई एज्युकेशन सोसायटीमध्ये त्या पदाधिकारी आहेत. त्यांचे पती सतीश पाटील हे मुश्रीफ यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. गडहिंग्लज, आजरा चंदगड मतदारसंघातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. गडहिंग्लज तालुक्याला आजपर्यंत कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही.

त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीकडून शोभा फराकटे, मानसी कल्लाप्पा भोगण, अमृता अरुण डोंगळे, राजकुंवर रणवीर गायकवाड यासुध्दा दावेदार ठरू शकतील, अशा सदस्या आहेत. फराकटे या कागल तालुक्यातील आहेत. भोगण या चंदगड तालुक्यातील असून, तिथे दोन्ही काँग्रेसने भाजपचा रथ रोखला आहे. अमृता डोंगळे या राधानगरी तालुक्यातून, तर गायकवाड या शाहूवाडी तालुक्यातून एकमेव जिंकल्या आहेत. भोगण, डोंगळे व गायकवाड या प्रथमच निवडून आल्या आहेत.

Web Title : कोल्हापुर ZP 2026: अध्यक्ष पद NCP के लिए संभावित; पाटिल, फराकटे चर्चा में

Web Summary : कोल्हापुर ZP का अध्यक्ष पद 2026 में NCP को मिलने की संभावना है। हसन मुश्रीफ द्वारा समर्थित शैलजा पाटिल एक मजबूत दावेदार हैं। अन्य उम्मीदवारों में शोभाताई फराकटे, मानसी भोगन और अमृता डोंगले शामिल हैं। सबकी निगाहें आगामी चुनावों पर हैं।

Web Title : Kolhapur ZP 2026: NCP Favored for Chairperson; Patil, Farakte in Discussion

Web Summary : NCP likely to secure Kolhapur ZP's chairperson post in 2026. Shailaja Patil, backed by Hasan Mushrif, is a strong contender. Other candidates include Shobhatai Farakte, Mansi Bhogan, and Amruta Dongle. All eyes are on the upcoming elections.