शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या कोल्हापुरातील कृषी भवनला आता मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:57 IST

सात वर्षांपूर्वी मारली होती कुदळ : त्यावेळी निधी मिळाला नाही, आता मंजुरी मिळाल्याने कार्यालय येणार

कोल्हापूर : सात वर्षांपूर्वी शेंडा पार्कात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन केलेल्या कृषी भवनच्या सुधारित आराखड्यास गुरुवारी मंजुरी मिळाली. कृषी विभागाने प्रशासकीय मान्यता देऊन ३५ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. यामुळे सात ते आठ वर्षापासून केवळ कागदावर असलेली इमारत प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग खुला होणार आहे.शेंडा पार्कातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १.१४ हेक्टर जमीन २९ डिसेंबर २०१८ साली कृषी विभागाकडे वर्ग केली. त्यानंतर १३ जून २०१९ रोजी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन झाले. मात्र, इमारतीसाठी निधी मिळाला नव्हता. प्रत्यक्षात इमारतीसाठी एक वीटही ठेवण्यात आली नाही. इमारतीचा आराखडा कागदावरच राहिला.यामुळे कृषी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळा, रासायनिक खते पृथ्थकरण प्रयोगशाळा, कीटकनाशके पृथ्थकरण प्रयोगशाळा, भांडारगृह, अभ्यागत, अभिलेख कक्ष अशी कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. परिणामी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने सुधारित ३५ कोटी ३१ लाखांचा आराखडा तयार केला. त्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

तीन वर्षात निधीनिधी पुढील तीन वर्षांच्या आर्थिक वर्षात मिळणार आहे. परिणामी भवनची इमारत पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाच्या कार्यालयांना हक्काची जागा मिळणार आहे. शिवाय इमारतीचे द्यावे लागणारे वार्षिक सुमारे २० लाखांचे भाडे वाचणार आहे.

पूर्वीचा आराखडा ४३ कोटींवरचासन २०१८पासून कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी कृषी भवन बांधण्याची चर्चा सुरू आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ४३ कोटी ७० लाखांचा आराखडा तयार केला होता. मात्र, प्रत्यक्षात निधी मिळाला नसल्याने कृषी भवन उभारले नाही. पूर्वीच्या आराखड्याच्या निधीत कपात करून सुधारित केलेल्या ३५ कोटी ३१ लाखांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे.

कृषी भवनसाठी ३५ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. भवनमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. - अमल महाडिक, आमदार 

जिल्हा कृषिसंपन्न आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी अत्याधुनिक कृषी भवन आवश्यक होते. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने कृषी भवनसाठी निधी मंजूर केला. - सतेज पाटील, आमदार, गटनेते विधानपरिषद काँग्रेस

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's long-awaited Krishi Bhavan gets approval after foundation stone laid

Web Summary : Kolhapur's Krishi Bhavan project, initiated seven years ago, finally gets administrative approval with ₹35.31 crore funding. This clears the path for construction, consolidating agricultural offices and saving ₹20 lakh annually in rent, benefiting farmers in three districts.