कोल्हापुरातील सीपीआरमध्ये होणार पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:19 IST2026-02-14T16:19:28+5:302026-02-14T16:19:50+5:30

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सीपीआरमध्ये पहिले सरकारी ...

The first government IVF, test tube baby center will be set up in CPR, Kolhapur. | कोल्हापुरातील सीपीआरमध्ये होणार पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी केंद्र

संग्रहित छाया

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सीपीआरमध्ये पहिले सरकारी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी केंद्र होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून राज्यात पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा मोफत राहणार आहे.

गेल्या काही वर्षांत वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, विवाहाचे वाढते वय, वाढता स्थूलपणा यासह अन्य कारणांमुळे अपत्यप्राप्तीसाठी नवदाम्पत्यांसमोर अनेक अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक खासगी रुग्णालयांनीही आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी सेंटर्स सुरू केली असून भारतभर असलेल्या साखळी रुग्णालयातील केंद्रेही कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत; परंतु ही उपचार प्रणाली महागडी आहे. या उपचाराचा भाग असलेल्या एका सायकलसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येतो. काही वेळा पहिल्या प्रयत्नात यश येत नाही.

यासाठी काही जादा सायकल्स कराव्या लागतात. त्यामुळे साहजिकच हा खर्च वाढत जातो.
एकीकडे वंध्यत्वामुळे घरासह समाजातून मारले जाणारे टोमणे, त्यामुळे होणारी नवरा-बायकोची मानसिक घुसमट आणि यासाठीचा मोठा खर्च यातून सुटका होण्यासाठी आता सीपीआरमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पहिल्या सरकारी आयव्हीएम, टेस्ट ट्यूब बेबी केंद्राचा दिलासा मिळणार आहे.

Web Title : कोल्हापुर सीपीआर में पहला सरकारी आईवीएफ, टेस्ट ट्यूब केंद्र शुरू होगा

Web Summary : कोल्हापुर के सीपीआर अस्पताल में जल्द ही मुफ्त आईवीएफ और टेस्ट-ट्यूब बेबी सेवाएं उपलब्ध होंगी, जो राज्य में किसी सरकारी संस्थान में पहली बार होगा। मंत्री हसन मुश्रीफ द्वारा संचालित इस पहल का उद्देश्य बांझपन के इलाज से जुड़े वित्तीय बोझ और सामाजिक कलंक को कम करना है, जिससे कई जोड़ों को उम्मीद मिलेगी।

Web Title : Kolhapur CPR to Launch First Government IVF, Test Tube Center

Web Summary : Kolhapur's CPR hospital will soon offer free IVF and test-tube baby services, a first for a government institution in the state. This initiative, driven by Minister Hasan Mushrif, aims to alleviate the financial burden and social stigma associated with infertility treatments, providing hope to many couples.