शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात नवीन राजवाड्यातील दरबार हॉलने ७९ वर्षांनी अनुभवला राज्याभिषेकाचा सोहळा

By भारत चव्हाण | Updated: June 6, 2025 13:13 IST

यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर सुवर्ण अभिषेक करण्यात आला

भारत चव्हाण

कोल्हापूर : फुलांच्या माळांची सजावट, रांगोळ्यांनी सजलेला परिसर, भालदार-चोपदारांची लगबग, राजपरिवारासह मानकऱ्यांची उपस्थिती, सनई  चौघड्यांचे मंजूळ स्वर, शाहीरी पोवाड्यांच्या कवनांनी चेतवलेली स्फुर्ती, मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे लयबद्ध सादरीकरण  आणि मंत्रोच्चाराचा जयघोष अशा आवेशपूर्ण वातावरणात शुक्रवारी नवीन राजवाड्याच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा शाही सोहळा पार पाडला.

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट व शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट, कोल्हापूर यांनी ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले.  हा सोहळा नवीन राजवाड्यासमोरील प्रांगणात होत असतो, परंतू गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हा सोहळा ऐनवेळी ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये घेण्यात आला. या दरबार हॉलमध्ये शेवटचा राज्याभिषेक १९४६ मध्ये छत्रपती शहाजी महाराज यांचा झाला होता. त्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी दरबार हॉलने राज्याभिषक दिनाचा सोहळा अनुभवला. त्याचे साक्षीदार होण्याचा मान करवीरकरांनी मिळाला. 

रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांच्या माळा यांनी दरबार हॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजल्यापसून सनई चौघड्यांचे मंजुळ स्वरांनी वातावरण मंगलमय करुन टाकले. मान्यवरांचे आगमन होईल तसे मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण सुरु झाले. 

खासदार शाहू छत्रपती, महाराणी याज्ञसेनीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे  दरबार हॉलमध्ये आगमन होताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले तर मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाने त्यांना मानवंदना दिली. 

राजपरिवारासह मान्यवर स्थानापन्न झाल्यानंतर शाहीर विशारद आझाद नायकवडी, मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण, तसेच छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची सुवर्णमूर्ती मिरवणुकीने समारंभस्थळी आणली. यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर सुवर्ण अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा, आरती पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने झालेल्या जयघोषाने दरबार हॉल दणाणून गेला.

याप्रसंगी आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी,पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ  इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, विजयराव देवणे, तेज घाटगे, जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांच्यासह नील बावडेकर, रणजितसिंह चव्हाण  हिंमतबहाद्दर, बाळ पाटणकर, प्रदुम्नराजे खर्डेकर, निवृत्त कर्नल विजयसिंह  गायकवाड, ऋतुराज इंगळे, शिवराज  गायकवाड, देवस्थानचे ट्रस्टी ॲड. राजेंद्र चव्हाण, प्रनील इंगळे, विनायकराव घोरपडे माद्याळकर, विश्वजित घाटगे केनवडेकर यांच्या समाजातील  मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेकShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती