स्टेट्सवर दहशत निर्माण करणारा मजकूर; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:06+5:302021-07-03T04:17:06+5:30

इचलकरंजी : शहापूर येथील दत्तनगरमधील एकाने स्टेट्सवर दहशत निर्माण करण्यासारखा मजकूर ठेवला होता. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी त्याला अटक करून ...

Text that terrorizes the states; One arrested | स्टेट्सवर दहशत निर्माण करणारा मजकूर; एकास अटक

स्टेट्सवर दहशत निर्माण करणारा मजकूर; एकास अटक

इचलकरंजी : शहापूर येथील दत्तनगरमधील एकाने स्टेट्सवर दहशत निर्माण करण्यासारखा मजकूर ठेवला होता. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. योगेश उत्तम ऊर्फ अनिल तुप्परवाडकर (वय २५) असे त्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, योगेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेट्सवर 'संपलो नाही, संपवणार आहे. थोडे दिवस थांब, तुझा पण गेम मीच वाजवणार आहे' असा दहशत निर्माण करणारा मजकूर ठेवला होता. त्या व्हिडीओमध्ये शस्त्र ठेवून ज्याच्याशी त्याचा वाद आहे, त्याचे नावही या व्हिडीओमध्ये त्याने ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली.

फोटो ओळी

०२०७२०२१-आयसीएच-०६- योगेश तुप्परवाडकर

Web Title: Text that terrorizes the states; One arrested