शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तेरणीच्या ‘शानुल’ची बॉडी बिल्डींगमध्ये नाव कमावण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

(फोटो-०९०५२०२१-कोल-शानुल अंकली) सादिक नगारसे, लोकमत न्यूज नेटवर्क हलकर्णी : घरात अठराविश्व दारिद्र्य असताना जिद्द, मेहनतीच्या बळावर रंगरंगोटी व वाॅलपुट्टीचे ...

(फोटो-०९०५२०२१-कोल-शानुल अंकली)

सादिक नगारसे, लोकमत न्यूज नेटवर्क

हलकर्णी : घरात अठराविश्व दारिद्र्य असताना जिद्द, मेहनतीच्या बळावर रंगरंगोटी व वाॅलपुट्टीचे काम करत तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील शानुल हसन अंकली याने बॉडी बिल्डींगमध्ये अल्पावधीतच कोल्हापूरसह बेळगावमध्ये नाव कमावले. आर्थिक परिस्थितीवर मात करत त्याने राज्य व देश पातळीवर झेप घेण्याची तयारी सुरू केली आहे.

‘शानुल’ची ना शेती… ना अन्य कोणते उत्पन्नाचे साधन, यामुळे मोलमजुरीतूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. वडील एका हाताने अपंग, आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीचे काम करते. अशातच शरीर पाहून मित्रांनी ‘बॉडी बिल्डींग’चा सल्ला दिला. शानुलने दोन वर्षातच १० वेगवेगळ्या स्पर्धांतून आपली योग्यता सिद्ध केली. परिस्थिती तुमच्या ध्येयापुढे नतमस्तक होते फक्त आपला निश्चय दृढ असायला हवा, असे काहीसे विचार असणाऱ्या ‘शानुल’ने अथक परिश्रमातून शरीरयष्टी कमावली आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने तो रंगरंगोटी व वाॅलपुट्टी असे मजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावतो. नेताजी पालकर ग्रुपने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्याने यश मिळवले आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. काेल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद पटकावले. आता त्याने राज्य व देश पातळीवर झेप घेण्याची तयारी केली आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही त्याने सुरू केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.

कोट -

घरची परिस्थिती हालाखीची असतानाही या क्षेत्राची निवड करण्याचे धाडस केले. मी कोणतेही काम मनापासून व झोकून देऊन करतो, कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून ध्येयापर्यंत पोहचेन.

- शानुल अंकली