शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाचा फलक फाडल्याने तणाव

By admin | Updated: September 6, 2015 00:36 IST

क्रशर चौकातील घटना : जिल्हाध्यक्ष - नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत जोरदार वादावादीसह धक्काबुक्की

कोल्हापूर : क्रशर चौकात पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक (फ्लेक्स) फाडल्याच्या संशयावरून शुक्रवारी मध्यरात्री नगरसेवक व जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांस शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने गोंधळ उडाला. या प्रकाराने मात्र शनिवारी दिवसभर परिसरात तणावपूर्ण वातावरण बनल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा करीत आहेत. त्यासाठी शहरात किंवा अन्यत्र वाढदिवस शुभेच्छांचे डिजिटल फलक लावून वातावरण निर्मिती केली जात आहे. आज, रविवारी संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेवकाचा वाढदिवस आहे. त्यासाठी त्यांचे शहरात डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. ४) मध्यरात्री क्रशर चौकात दोघांचे कार्यकर्ते डिजिटल फलक लावण्यासाठी आले. या ठिकाणी जागेच्या वादातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी कार्यकर्त्यांत एकमेकांस बघून घेण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करीत धक्काबुक्की झाल्याने गोंधळ उडाला. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांना समज देऊन वाद मिटविण्यात आला. दोघांचेही फलक या ठिकाणी लावण्यात आले. त्यानंतर पोलीस निघून गेले. त्यानंतर काही क्षणांतच जिल्हाध्यक्षाचा डिजिटल फलक फाडल्याचे कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी या प्रकाराची माहिती जिल्हाध्यक्षाना दिली. ते काही कार्यकर्त्यांसह चौकात आल्याने पुन्हा वातावरण तणावग्रस्त बनले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना आग्रह धरला. अखेर निवडणुकीपूर्वी वाद नको, म्हणून जिल्हाध्यक्षाने नरमाईची भूमिका घेत वादावर पडदा टाकल्याची घटनास्थळी चर्चा होती. (प्रतिनिधी)