दोन कोटींच्या निविदा मंजूर

By Admin | Updated: November 28, 2014 23:43 IST2014-11-28T23:12:23+5:302014-11-28T23:43:29+5:30

मुरगूड पालिका सभा : स्वच्छता अभियानाला बळकटी देण्याचा निर्णय

Tender sanction of two crores | दोन कोटींच्या निविदा मंजूर

दोन कोटींच्या निविदा मंजूर

मुरगूड : नगरोत्थान योजनेतून मुरगूड नगरपरिषदेसाठी मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आलेल्या दोन कोटी रुपयांच्या निविदांना सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी ही विकासकामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन अत्यंत दर्जेदार काम करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माया चौगले होत्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेतर्फे शहरातील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी कचरापेट्या (बकेट) देण्याचा निर्णय या सभेत झाला. विषयपत्रिकेवरील सर्वच २४ विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी बी. एस. जगताप, अनिल पठाण, सूर्याजी भोपळे, संतोष गुरव, शहर अभियंता प्रकाश पोतदार, शशिकांत मोहिते, मारुती शेट्टी, दिलीप कांबळे, आदींनी कार्यालयीन माहिती पुरविली.
अपूर्ण कामांना मुदतवाढ व अदा केलेल्या बिलास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. काही विकासकामांवर अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा जादा खर्च झाला आहे. हा जादा खर्च नगरपरिषदेच्या निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात आली. याशिवाय शहरातील नगरपरिषदेच्या पॅव्हेलियनमधील आठ सिटस्, जनावर बाजारातील दोन सिटस्, जुने पोलीस ठाण्याजवळील आठ सिटस् व दत्त मंदिर रोडवरील व चार सिटस्ची शौचालये जीर्ण व धोकादायक झाली आहेत. त्यामुळे तिथे नवीन शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. चर्चेमध्ये अजितसिंह पाटील, संतोषकुमार वंडकर, शिवाजी इंदुलकर, परेश चौगले, किरण गवाणकर, सुहास खराडे, वसुधा कुंभार, गौराबाई सोनुले, नम्रता भांदिगरे, रेखा सावर्डेकर, फुलाबाई कांबळे, आदींनी भाग घेतला. नगराध्यक्षा माया चौगले यांनी आभार मानले. (वार्ताहर)


उत्पन्न वाढविण्याचा निर्णय
जून २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीने करण्याची रक्कम आठ लाख २० हजार रुपये १३ व्या वित्त आयोगातून अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमर कांबळे यांना सेवेत सामावून घेणे, खुले नाट्यगृहाची इमारत बांधून पूर्ण असलेली इमारत, तसेच दुकान केंद्र १० व वाचनालयाच्या इमारतीचे सभागृह भाडे तत्त्वावर देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Tender sanction of two crores