शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक ‘ड्रेस कोड’ सक्तीला शिक्षक संघटनांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

चंदगड : कोल्हापूर जिल्हा परिषदेने जि.प. शाळेतील शिक्षक, शिक्षिकांना विशिष्ट रंगातील गणवेशात शाळेत येण्यासाठी आदेश काढला आहे. या आदेशाला ...

चंदगड : कोल्हापूर जिल्हा परिषदेने जि.प. शाळेतील शिक्षक, शिक्षिकांना विशिष्ट रंगातील गणवेशात शाळेत येण्यासाठी आदेश काढला आहे. या आदेशाला चंदगड तालुक्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन पं.स. सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे व गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांना देण्यात आले आहे. जि.प. शाळेतील शिक्षक-शिक्षिकांना गणवेशाद्वारे ओळख निर्माण करून द्यायचा जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा मनोदय आहे. तथापि, या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. या अनुषंगाने आज चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, पदाधिकारी व प्रतिनिधींनीही ‘ड्रेसकोड सक्ती’ मागे घ्यावी. याबाबतचे निवेदन चंदगड पं.स. सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे, गटशिक्षणाधिकारी सुभेदार व शिक्षण विस्तार अधिकारी एम.टी. कांबळे यांना दिले आहे.

ड्रेसकोडबाबतीत शिक्षकांच्या तीव्र भावना लक्षात घेता प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होऊ दिली जाणार नाही. हा आदेश मागे घेण्यासंदर्भात जि.प. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन सभापती कांबळे यांनी समन्वय समितीला दिले.

यावेळी रमेश हुद्दार, धनाजी पाटील, शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, सदानंद पाटील, अशोक नौकूडकर, बाबू परीट, एन.व्ही. पाटील, रवींद्र साबळे, राजू जोशी आदी उपस्थित होते.