शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संपावर जाणार, शाळा बंद

By admin | Updated: August 25, 2015 23:53 IST

२ सप्टेंबरच्या संपात सहभाग : लवेकर, आरडे यांची माहिती, कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन

कोल्हापूर : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील प्रमुख ११ कर्मचारी संघटनांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यांच्याशी सहमती दर्शवून राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीनेही या संपात उतरणार असल्याचे जाहीर केले.या दिवशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद राहतील, असे संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर व ज्येष्ठ शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक मिळून ७० हजार कर्मचारी व शिक्षक सामील होत आहेत.या संपाबाबत माहिती देताना अनिल लवेकर म्हणाले, महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेली पाच वर्षे प्रलंबित आहेत; तर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्याही गेली सात वर्षे प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर घेतलेल्या काही निर्णयांना मध्यवर्ती व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने विरोध केला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण रद्द करू नये, सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, आदी मागण्या केल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली कोणतीही शाळा बंद करू नये, शिक्षक व शिक्षकेतर सेवक भरतीवरील बंदी उठवावी, आदी जिल्हा पातळीवर शैक्षणिक व्यासपीठाच्या प्रलंबित मागण्या करण्यात आल्या. या दिवशी सकाळी १० वाजता संग्राम उद्यान (टाउन हॉल) येथे सर्व कर्मचारी एकत्र येतील. तेथून दुपारी १२ वाजता निघणाऱ्या कोल्हापूर जिल्हा संयुक्त कामगार, कर्मचारी व शिक्षक संघटना कृती समितीच्या मोर्चामध्ये सामील होतील. हा मोर्चा टाउन हॉल, महापालिका, लुगडी ओळ, बिंदू चौक मार्गे मिरजकर तिकटी येथे आल्यानंतर बालगोपाल तालमीसमोर मोर्चा विसर्जित होणार आहे. या पत्रकार परिषदेस माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, राम पाटील, बी. डी. पाटील, डॉ. शिवाजी हिलगे, एस. बी. लाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी होणार सहभागीया मोर्चात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सामील होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहतील, अशी माहिती खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, ज्येष्ठ शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी यावेळी दिली.