पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST2021-05-18T04:24:04+5:302021-05-18T04:24:04+5:30

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील शासकीय कोविड केंद्रामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल वारंवार तक्रारी येत आहेत. त्याचा अनुभव मला स्वत: ...

Take action against those who take money, otherwise fast | पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा उपोषण

पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा उपोषण

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील शासकीय कोविड केंद्रामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल वारंवार तक्रारी येत आहेत. त्याचा अनुभव मला स्वत: आला आहे. मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्यासाठी सहा हजार रुपये मागणी केली जात आहे. हा प्रकार गंभीर असून, येथील प्रशासनावर तात्काळ कारवाई करा अन्यथा बुधवारी कोविड सेंटरच्या प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसणार असल्याचे पत्र समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना दिले.

कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून वार्डबॉय दीपक शिंदे व देवदान शिंदे नामक ब्रदरने पैशाची मागणी केली आहे. त्याविरुद्ध नातेवाईकांनी कोरोना सेंटरमध्ये ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे या प्रकरणात एकटे शिंदे सहभागी नसून, डॉ. कंदले, डॉ. भोसले यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी आहेत. हे प्रकरण गंभीर असून, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. या प्रकरणामधील सर्वांवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा बुधवारी कोविड सेंटरच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही सासणे यांनी दिला आहे.

Web Title: Take action against those who take money, otherwise fast