शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाची जुनी इमारत न देणाऱ्या अधिकाऱ्यांचे पंचगंगेत प्रतीकात्मक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर असताना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सीपीआरसमोरील न्यायालयाची जुनी इमारत देण्यास नकार देणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक पंचगंगा नदीत विसर्जन करून निषेध नोंदवला. एकाने दीपमाळेवर चढून नदीत उडी मारली. आंदोलकांनी निदर्शने करत शंखध्वनी केला. नागरी कृती समितीच्यावतीने बुधवारी दुपारी पंचगंगा घाटावर आंदोलन केले.

ठळक मुद्देन्यायालयाची जुनी इमारत न देणाऱ्या अधिकाऱ्यांचे पंचगंगेत प्रतीकात्मक विसर्जन नागरी कृती समितीचे अनोखे आंदोलन : आंदोलकांनी केला निषेध, शंखध्वनी

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असताना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सीपीआरसमोरील न्यायालयाची जुनी इमारत देण्यास नकार देणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक पंचगंगा नदीत विसर्जन करून निषेध नोंदवला. एकाने दीपमाळेवर चढून नदीत उडी मारली. आंदोलकांनी निदर्शने करत शंखध्वनी केला. नागरी कृती समितीच्यावतीने बुधवारी दुपारी पंचगंगा घाटावर आंदोलन केले.कोल्हापुरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य प्रशासनास उपचारासाठी जागा अपुरी पडत आहे. न्यायालयाची जुनी इमारत कोविड केअर सेंटरसाठी द्यावी, अशी मागणी कृती समितीने केली, पण संबंधित इमारत मागू नका, असा स्पष्ट आदेश राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. त्याच्या निषेधार्थ नागरी कृती समितीच्यावतीने हे अनोखे आंदोलन केले.आंदोलकांनी निषेधाचे व मागण्यांचे फलक उंचावत नदी घाटावर शंखध्वनी केला. एका आंदोलकाने तोंडावर अधिकाऱ्याचा मुखवटा लावून दीपमाळेवर चढून इमारत देणार की जीव घेणार असे म्हणतच पाण्यात उडी टाकली. आंदोलनात अशोक पवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, रामभाऊ कोळेकर, उदय भोसले, सुनील मोहिते, राजेश वरक, संभाजीराव जगदाळे, प्रभाकर डांगे, विनोद डुणुंग, समर्थ डांगे, विक्रांत पाटील-किणीकर, माणिक मंडलिक, अजित सासणे, महादेव पाटील, परवेज सय्यद, श्रीकांत भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी, भाऊ सुतार, चंद्रकांत पाटील, पंपू सुर्वे, आदी उपिस्थत होते.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवाकोविड उपचारासाठी जागा मागू नका, देणार नाही म्हणणाऱ्या शासन अधिकाऱ्यांविरोधी संबंधित यंत्रणेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून दोन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा कोल्हापूरकरच त्यांच्यावर गुन्हा नोंदवतील, असा इशारा कृती समितीने दिला. लोकप्रतिनिधी, मंत्री व बार असोसिएशनने वजन वापरुन ही इमारत उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर