स्वाती सासने यांनी विश्वास सार्थ ठरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:23 IST2021-03-08T04:23:54+5:302021-03-08T04:23:54+5:30

उदगाव : उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात समाजकल्याण सभापती स्वाती सासने यांनी १५ कोटींची विकासकामे केली आहेत. त्यांच्या माध्यमातून या ...

Swati Sasne decided to believe | स्वाती सासने यांनी विश्वास सार्थ ठरविला

स्वाती सासने यांनी विश्वास सार्थ ठरविला

उदगाव : उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात समाजकल्याण सभापती स्वाती सासने यांनी १५ कोटींची विकासकामे केली आहेत. त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. मतदारांनी ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पाटील यांनी रविवारी केले.

उदगाव (ता. शिरोळ) येथील सामाजिक सभागृहाच्या बांधकामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. २५१५ योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपयांच्या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सासने म्हणाल्या, माझ्या कार्यकाळातील उर्वरित एक वर्षात अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण करून मी मतदारांचा विश्वास जपणार आहे. तद्नंतर आगर (ता. शिरोळ) येथील मगदूम सोसायटीतील १० लाख रुपयांच्या रस्त्याचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

यावेळी सरपंच कलिमून नदाफ, अरुण कोळी, राजू मगदूम, सलीम पेंढारी, दिलीप कांबळे, दीपिका कोळी, बापू सासने, सावित्री मगदूम, संजय सासने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आगर येथे सरपंच अमोल चव्हाण, असिया गवंडी, शुभांगी लडगे, श्रुती भोसले, डॉ. सुकुमार पाटोळे, जोंग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - ०७०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथे सभागृहाच्या बांध‌कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, स्वाती सासने, कलिमून नदाफ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Swati Sasne decided to believe