Kolhapur: आळते येथील परप्रांतीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:40 IST2025-06-17T11:39:41+5:302025-06-17T11:40:31+5:30

हातावर, पायावर आणि गळ्याभोवती जखमाचे व्रण दिसत असल्याने मृत्यूचे गूढ वाढले

Suspicious death of migrant child in Aalte kolhapur | Kolhapur: आळते येथील परप्रांतीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Kolhapur: आळते येथील परप्रांतीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत फैजान नजीम या ११ वर्षीय परप्रांतीय मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला. हा प्रकार सोमवार दि. १६ जून रोजी पहाटे उघडकीस आला. त्यांच्या हातावर, पायावर आणि गळ्याभोवती जखमाचे व्रण दिसत असल्याने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाने त्यांचा मृतदेह सी.पी.आर. रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाकडे पाठविल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या घटनेचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, आळते येथे धार्मिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत बिहार, उतर प्रदेश, आंध्र प्रदेशसह इतर राज्यांतून ७० ते ८० विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत. बिहारचा विद्यार्थी फैजान नजीम रविवारी रात्री जेवण करून रात्री १० ते ११ च्या दरम्यान इतर विद्यार्थ्यांसोबत झोपला. पहाटे पाच वाजता तो झोपेतून उठलाच नाही. त्याला तत्काळ उपचाराकरिता हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. मयत फैजान याचा मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Suspicious death of migrant child in Aalte kolhapur