शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश हाळवणकर यांची अध्यक्षपदी निवड

By admin | Updated: November 14, 2014 00:37 IST

वस्त्रोद्योग धोरण : एकसदस्यीय समिती

इचलकरंजी : राज्यातील वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करून कापूस ते गारमेंट अशी उत्पादन साखळी निर्माण करण्याबरोबरच अस्तित्वातील उद्योगाला सोयी-सवलती देण्यासाठी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या निवडीचे पत्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, गुरुवारी मुंबईमध्ये सुपूर्द केले. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, उपसचिव डी. ए. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.इचलकरंजी वस्त्रनगरीच्यादृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. राज्यात इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव, विटा, नागपूर, सोलापूर, मोमीनपुरा याठिकाणी यंत्रमाग व पूरक वस्त्रोद्योग विकेंद्रित स्वरूपात पसरला आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. गत सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे हा उद्योग अनेक अडचणीतून जात आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर यांनी वस्त्रोद्योगमंत्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार मंत्री पाटील यांनी वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांना तातडीने सूचना देऊन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. आज या समितीचा शासन आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करण्यासाठी शिफारशी करणे, राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्व कापसांवर राज्यातच प्रक्रिया होईल यासाठी कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारणे, वस्त्रोद्योगाचे एकत्रिकरण करणे, नवीन टेक्स्टाईल हब, प्रोसेसिंग, टेक्स्टाईल मेगासिटी यासाठी शिफारस करणे, यंत्रमागांच्या आधुनिकीकरणासाठी उपाय, अस्तित्वातील सहकारी यंत्रमाग संस्थांचे बळकटीकरण करणे, यंत्रमाग कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक, कामगार कायद्यात सुधारणा, निर्यात वाढ यासाठी शिफारशी करण्याची कार्यकक्षा ठरवून देण्यात आली आहे. वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी समितीला योग्य वाटेल, अशा बाबींवर उपाय सूचवू शकते. या समितीमध्ये वस्त्रोद्योग, उद्योग ऊर्जा व कामगार, वित्त, पर्यावरण, सहकार विभाग, तसेच वस्त्रोद्योग संचालक नागपूर सदस्य आहेत. (प्रतिनिधी)