आजरा बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश डांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:24+5:302021-01-14T04:20:24+5:30

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी स्वागत केले. अरुण काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वसाधारण गटातून अशोक चराटी, सुरेश ...

Suresh Dang as the Chairman of Ajra Bank | आजरा बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश डांग

आजरा बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश डांग

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी स्वागत केले. अरुण काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वसाधारण गटातून अशोक चराटी, सुरेश डांग, विलास नाईक, दीपक सातोस्कर, प्रकाश वाटवे, अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, किशोर भुसारी, बसवराज म्हाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, अस्मिता सबनीस, मुख्यालय वगळता जिल्ह्यातील अन्य शाखा गटातून सुनील मगदूम, मुंबई शाखा प्रतिनिधी गटातून सूर्यकांत भोईटे, राज्याबाहेरील शाखा गटातून किरण पाटील, महिला प्रतिनिधी प्रणिता केसरकर, शैला टोपले, अनुसूचित जाती-जमाती गटातून संजय चव्हाण यांची निवड झालेचे जाहीर केले.

बँकेच्या संचालक मंडळाने जिल्हा, राज्य व देशात अग्रगण्य बँकांच्या यादीत आजरा बँकेचे नाव पोहोचविले आहे. सभासदांचा संचालक मंडळावरील विश्वास यापुढेही असाच राहू द्या. निवडणूक बिनविरोध करणेत संचालक व सभासदांचे श्रेय आहे, असे विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी सांगून क्रियाशील सभासदाबद्दल माहिती दिली. निवडणूक बिनविरोधासाठी शाखा सल्लागारांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. येत्या वर्षभरात बँकेच्या सर्व अडचणी संपतील. सभासदांनी दाखविलेला विश्वास येत्या पाच वर्षात सार्थ करून दाखविला जाईल, असे नूतन संचालक व अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी सांगितले.

---------------------

* शेड्युल बँकेचे वाटचाल

राज्यात अग्रगण्य असणारी आजरा बँक येत्या ५ वर्षात शेड्युल बँक करणेचा आमचा मानस आहे. १ हजार कोटींच्या ठेवी व ८०० कोटींची कर्जवाटप करून ते पूर्ण केले जाईल, असे अशोक चराटी यांनी सांगताच सभासदांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.

------------------------

* टोपले घराण्याच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा

शैला टोपले या आजरा बँकेत क्लार्क ते असिस्टंट जनरल मॅनेंजर या पदावर ३५ वर्षे नोकरीत होत्या. निवृत्तीनंतर गेली पाच वर्षे तज्ज्ञ संचालक व आता उपाध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली आहे. टोपले घराण्यातील आजरा बँकेत महिला उपाध्यक्ष होण्याचीही संधी त्यांना मिळाली आहे. सर्वसाधारण सभेसाठी बँकेचे सर्व संचालक विभागीय उपनिबंधक कार्यालयातील मिलिंद ओतारी, समीर कळके, अ‍ॅड. लुईस शहा यासह सभासद उपस्थित होते.

असिस्टंट जनरल मॅनेजर तानाजी गोविलकर यांनी सूत्रसंचलन केले. ज्येष्ठ संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.

-----------------------

* अध्यक्षपदासाठी डांग यांचे नाव विलास नाईक यांनी सूचविले. त्यास अशोक चराटी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी टोपले यांचे नाव प्रकाश वाटवे यांनी सूचविले. त्यास रमेश कुरुणकर यांनी अनुमोदन दिले.

-----------------------

* सुरेश डांग : १३०१२०२१-गड-०५

* शैला टोपले : १३०१२०२१-गड-०६

Web Title: Suresh Dang as the Chairman of Ajra Bank