सर्वोच्च न्यायालयाचा खर्च महाडिक करणार

By Admin | Updated: January 24, 2015 00:18 IST2015-01-24T00:18:31+5:302015-01-24T00:18:49+5:30

असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

The Supreme Court will make the cost of the case | सर्वोच्च न्यायालयाचा खर्च महाडिक करणार

सर्वोच्च न्यायालयाचा खर्च महाडिक करणार

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृ ती समितीने टोलप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयातील न्यायिक खर्चासाठी ३० व ३१ जानेवारीला ‘भीक मांगो’ आंदोलनाची घोषणा केली आहे. कृती समितीला हे आंदोलन मागे घेण्याची विनंती करीत, आमदार महादेवराव महाडिक यांनी टोलच्या न्यायिक कामासाठी येणारा सर्व खर्च उचलण्याची घोषणा आज, शुक्रवारी पत्रकाद्वारे केली आहे.
दरम्यान, महाडिक यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांची मदत जरूर घेऊ; मात्र, रस्त्यावरील आंदोलनाप्रमाणेच न्यायिक आंदोलनातही जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी ठरल्याप्रमाणे ‘भीक मागो’ आंदोलन होणारच, असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयीन लढाई व वकिलांची फी भागविण्यासाठी शुक्रवार (दि. ३०) व शनिवार (दि. ३१) ‘भीक मांगो आंदोलन’ करण्याचा निर्णय सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे.
ताराबाई रस्त्यावरील अंबाबाई मंदिरासमोरील मुख्य चौकातून सकाळी दहा वाजता या आंदोलनास सुरुवात होणार आहे.
याची दखल घेत आमदार महादेवराव महाडिक यांनी महाडिक उद्योग समूहातर्फे न्यायालयीन सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. (प्रतिनिधी)


सुप्रीम कोर्टातील लढ्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. भीक मांगो आंदोलनानंतरही राहिलेल्या पैशासाठी महाडिक यांची मदत घेऊ. मात्र, आंदोलन ठरल्याप्रमाणे होणारच.
-निवास साळोखे,
निमंत्रक, सर्वपक्षीय
टोलविरोधी कृती समिती


सर्वाेच्च न्यायालयातील सर्व न्यायिक खर्च महाडिक उद्योगसमूह करील. कोल्हापूरची जनता महाडिक कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी राहिली आहे. न्यायिक खर्चासाठी महाडिक असेपर्यंत भीक मागण्याची गरज नाही. कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे.
- आमदार महादेवराव महाडिक

Web Title: The Supreme Court will make the cost of the case