गडहिंग्लज रिंगरोड कृती समिती अध्यक्षपदी सुनील शिंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST2021-08-17T04:30:21+5:302021-08-17T04:30:21+5:30

गडहिंग्लज शहर रिंगरोड कृती समितीच्या अध्यक्षपदी आजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची, तर कार्याध्यक्षपदी डॉ. एम. ...

Sunil Shintre as Chairman of Gadhinglaj Ring Road Action Committee | गडहिंग्लज रिंगरोड कृती समिती अध्यक्षपदी सुनील शिंत्रे

गडहिंग्लज रिंगरोड कृती समिती अध्यक्षपदी सुनील शिंत्रे

गडहिंग्लज शहर रिंगरोड कृती समितीच्या अध्यक्षपदी आजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची, तर कार्याध्यक्षपदी डॉ. एम. एस. बेळगुद्री यांची निवड झाली.

येथील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या निवडी पार पडल्या. त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारिणीत बसवराज आजरी, रामगोंडा ऊर्फ गुंड्या पाटील, राजेंद्र तारळे, बाळासाहेब गुरव (सर्व उपाध्यक्ष), नागेश चौगुले व रमजान अत्तार (निमंत्रक), इंजि. चंद्रकांत सावंत (सचिव), आर्किटेक्ट विरूपाक्ष पाटणे व युवराज बरगे (सहसचिवपदी), राजशेखर यरटे (खजिनदार), अ‍ॅड. दिग्विजय कुराडे (कायदा सल्लागार), सयाजी भोसले, महेश सलवादे, अमर मांगले, रश्मीराज देसाई, दिलीप माने, दीपक मांगले, अशोक खोत (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.

मंत्री मुश्रीफ यांना भेटणार

प्रलंबित रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासनस्तरावरील मदत मिळविण्यासाठी लवकरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत झाला.

--------------------

- सुनील शिंत्रे : १६०८२०२१-गड-०९

- एम. एस. बेळगुद्री : १६०८२०२१-गड-१०

Web Title: Sunil Shintre as Chairman of Gadhinglaj Ring Road Action Committee