सुनंदा माने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:48+5:302021-05-31T04:17:48+5:30

कोल्हापूर : रंकाळा बसस्थानक परिसरातील सुनंदा अर्जुनराव माने (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या गुजरीतील प्रसिद्ध सराफ कै. ...

Sunanda Mane passed away | सुनंदा माने यांचे निधन

सुनंदा माने यांचे निधन

कोल्हापूर : रंकाळा बसस्थानक परिसरातील सुनंदा अर्जुनराव माने (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या गुजरीतील प्रसिद्ध सराफ कै. दिनकरराव परशुराम माने यांच्या स्नुषा, तर उच्च न्यायालयातील वकील गौरी किशोर जाधव व संजय माने यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सुनंदा यांचे माहेर कुरुंदवाड (ता.शिरोळ). तेथील एस. पी. हायस्कूलमध्ये त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांचे अर्जुनराव यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर त्या कोल्हापुरातच स्थायिक झाल्या. प्रेमळ स्वभावाच्या व शिस्तप्रिय होत्या. कुटुंबाला एकत्रित ठेवण्याबरोबरच त्या माने कुटुंबीयांचा मोठा आधार होत्या. नवनवीन माहिती घेणे, पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याकरिता विविध झाडांच्या बिया गोळा करणे आणि पर्यटन करणे यात त्यांना विशेष रुची होती. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फोटो : ३००५२०२१-कोल-सुनंदा माने (निधन)

Web Title: Sunanda Mane passed away