सुजय देसाई यांचा आचार्य पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:32+5:302021-09-22T04:27:32+5:30

देसाई यांना हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई ...

Sujay Desai honored with Acharya Award | सुजय देसाई यांचा आचार्य पुरस्काराने गौरव

सुजय देसाई यांचा आचार्य पुरस्काराने गौरव

देसाई यांना हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आश्रमाचे सचिव ॲड. वंदन गडकरी, श्री. धर्माधिकारी उपस्थित होते. देसाई यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी आजपर्यंत चारशे कविता आणि ५० लेख लिहिले आहेत. तीनशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनेल असून, त्यावर त्यांचे शैक्षणिक आणि प्रेरणादायी असे शंभर व्हिडिओ आहेत. त्यांना महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध संस्था, संघटनांचे १६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

फोटो (२१०९२०२१-कोल- सुजय देसाई (पुरस्कार) : कोल्हापुरातील उपक्रमशील शिक्षक सुजय देसाई यांना नागपूर येथील सर्वोदय आश्रमातर्फे मामा क्षीरसागर स्मृती आचार्य पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी लीलाताई चितळे, वंदन गडकरी, श्री धर्माधिकारी उपस्थित होते.

Web Title: Sujay Desai honored with Acharya Award