शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यातील तरुणाची नैराश्येतून आत्महत्या

By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST

सैन्य भरतीचे स्वप्न अधुरे : चार दिवसांपासून होता बेपत्ता; मोरे-मानेनगरमध्ये हळहळ

कोल्हापूर : सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याच्या नैराश्यातून तरुणाने पंचगंगा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज, रविवारी दुपारी उघडकीस आला. अमित विनायक कांबळे (वय २८, रा. मोरे-मानेनगर, कळंबा) असे त्याचे नाव आहे. तो १५ जानेवारीपासून बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह शिरोली पंचगंगा पुलाजवळ आढळला. याबाबत पोलिसांनी सांगितले, अमित कांबळे याचे वडील शाहूवाडीमध्ये ‘आयटीआय’मध्ये शिक्षक आहेत. आई घरकाम करते, तर लहान भाऊ सैन्यात आहे. दोन विवाहित बहिणी आहेत. त्याचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो प्रयत्न करीत होता; परंतु त्याला संधी मिळत नव्हती. गुरुवारी (दि. १५) दुपारी तो वडील आजारी असल्याने त्यांना औषध घेऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला, तो परत आलाच नाही. घरच्यांनी नातेवाईक, मित्रपरिवाराकडे शोधाशोध केली असता तो सापडला नाही. आज दुपारी चारच्या सुमारास शिरोली पंचगंगा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना लोकांना दिसून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती गांधीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ओळख पटण्यासाठी त्याच्या कपड्यांमध्ये शोधाशोध केली असता ओळखपत्र मिळून आले. त्यावरून पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला असता ते रुकडी (ता. हातकणंगले) येथील नातेवाइकांकडे गेले होते. पोलिसांचा फोन आल्याने ते ‘सीपीआर’मध्ये आले. याठिकाणी त्यांना मृतदेह दाखविला असता त्यांनी तो अमितचा असल्याचे ओळखत आक्रोश केला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराने ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली होती. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने तो नाराज होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा घटनास्थळी होती.