शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी कामगार महामंडळामार्फत पुरवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

जयसिंगपूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर हे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्यावतीने साखर कारखान्यांना पुरविण्यात यावे, अशी मागणी साखर आयुक्त शेखर ...

जयसिंगपूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर हे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्यावतीने साखर कारखान्यांना पुरविण्यात यावे, अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

ऊस तोडणी मजूर महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी साखर कारखान्यांकडून प्रतिटन दहा रुपयेप्रमाणे गोळा करून किमान १०० कोटी रुपये महामंडळास देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील ९ लाख ऊस तोडणी मजुरांना वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मदत करून त्यांना सक्षम करणे, राज्य सरकार व साखर उद्योगाची नैतिक जबाबदारी आहे. याबाबत दुमत असायचे कारण नाही; मात्र हा प्रश्न सोडवत असताना ऊसतोडणी मजुरांची पळवापळवी व मुकादमाकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक यामुळे साखर कारखानदारी प्रचंड अडचणीत आहे. याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. जर राज्यातील सर्व ऊसतोडणी मजुरांची अधिकृतरीत्या नोंदणी करून त्यांना गाळप हंगामापूर्वी दिला जाणारा ॲडव्हॉन्स हा महामंडळामार्फत दिला गेला आणि महामंडळानेच नोंदणीकृत ऊस वाहतूकदारांना साखर कारखान्यांच्या मध्यस्तीने मजुरांचा पुरवठा केला तर मुकादम ही व्यवस्थाच संपून जाईल.

ज्या पद्धतीने असंघटीत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. तशीच मदत ऊस तोडणी कामगारांना होऊ शकते. शिवाय हंगामापूर्वी दिला जाणारा ॲडव्हॉन्स हा साखर कारखान्याकडून त्यांच्या देय मजुरीतून परस्पर कपात करता येईल. ज्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पीक कर्जाची वसुली ९९ टक्के होते. तसेच या ॲडव्हॉन्सचीसुद्धा वसुली होऊ शकते. आतापर्यंत तोडणी मजुरांनी ॲडव्हॉन्स बुडवून पलायन केल्यामुळे राज्यातील किमान २०० हून अधिक वाहतूकदार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ते टाळता येईल व साखर उद्योगाला एक आर्थिक शिस्त लागेल, तरी वरील सुचनेचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी करून ऊस वाहतूक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेट्टी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.