शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

अशी ही सत्त्वपरीक्षा - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

ऑफिसमध्ये गेल्याबरोबर काकांच्या पायाला हात लावून बोलला. सावंतांच्या घरातच लखोटा सापडला. काकांनी भरतला मिठी मारली. म्हणाले, परमेश्वराने तुझी सत्त्वपरीक्षा ...

ऑफिसमध्ये गेल्याबरोबर काकांच्या पायाला हात लावून बोलला. सावंतांच्या घरातच लखोटा सापडला. काकांनी भरतला मिठी मारली. म्हणाले, परमेश्वराने तुझी सत्त्वपरीक्षा घेतली अन् तू पासही झालास. रविवारी सकाळी केशवकाका अन् भरत सावंतांच्या घरी गेले. सावंतांनी भरतचे तोंडभरून काैतुक केले अन् पैसे घरीच सापडल्याचे सांगितले. काका म्हणाले, भरतची बदनामी, मानसिक छळ अन् खोटा आळ करून पोलिसांचा धाक घालून आत्यंतिक छळ केल्याबद्दल मानहानीची भरपाई मागणी करणार आहोत. तुमचे पोलीस खात्यात मेहुणे जमादार आहेत तर माझे मेहुणे ख्यातनाम वकील काळदाते हे माहीत असतीलच, तर तुम्ही चांगल्यात चांगला वकील बघून काेर्टात केस लढण्यासाठी तयार राहा.

सावंत उठले अन् काकांचे पाय धरून म्हणाले. काका मी डोळस असून आंधळा होऊन भरतवर अन्याय केलेला आहे. तरी मला मोठ्या मनानी क्षमा करा.

पुढच्या रविवारी आमची जनरल मीटिंग आहे. काका बोलले. त्या मीटिंगमध्ये येऊन भरतला काय अन् कशी वागणूक देऊन त्याच्यावर आळ घेतला. तुमचे पैसे तुमच्याच घरी कसे मिळाले? हे सर्व वर्णन करून सर्वांच्यापुढे सांगायचे आहे. जर तुम्ही नाही आलात तर तयार केलेली क्लीप सभेत दाखवणार अन् केस दाखल होणार.

जनरल मीटिंगमध्ये सावंत चोरासारखे येऊन बसले. अन् काकांचा आदेश झाल्यानंतर सावंतांनी इत्थंभूत भरतबाबतची कहाणी कथन केली. भरतचे पाय धरून माफी मागितली. तशीच ही बातमी वर्तमानपत्रात गेली अन् सावंतांचा पूर्ण नक्षा उतरला.