राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कोल्हापूरच्या सहाजणांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST2021-03-22T04:21:25+5:302021-03-22T04:21:25+5:30

कोल्हापूर : इंदापूर (पुणे) येथे झालेल्या राज्य कुराश स्पर्धेत कोल्हापूर कुराश असोसिएशनच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीवर ...

Success of six from Kolhapur in National Qurash Competition | राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कोल्हापूरच्या सहाजणांचे यश

राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कोल्हापूरच्या सहाजणांचे यश

कोल्हापूर : इंदापूर (पुणे) येथे झालेल्या राज्य कुराश स्पर्धेत कोल्हापूर कुराश असोसिएशनच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीवर या सर्वांची राज्य संघात निवड झाली.

यश संपादन केलेल्यांमध्ये राजवीर पाटील (३० किलो), रुद्र पाटील (४० किलो), क्रिश मुकुंदन लिजीथ आयाडथील (४० किलोवरील), राजलक्ष्मी सूर्यवंशी (३६ किलोवरील गट), १३ ते १५ वर्षे गटात अखिलेश अष्टेकर (५० किलोवरील गट ) व निधी पाटील ( ४४ किलोवरील गट) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या कामगिरीवर या सहाजणांची पंचमढी (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली. या खेळाडूंना प्रशिक्षक शरद पोवार यांचे मार्गदर्शन, लालासोा गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले.

फोटो : २१०३२०२१-कोल-कुराश

ओळी :

इंदापूर (पुणे) येथे झालेल्या राज्य कुराश स्पर्धेत यश मिळविणारे कोल्हापूर जिल्हा कुराश असोसिएशनचे खेळाडू.

Web Title: Success of six from Kolhapur in National Qurash Competition