शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘कामे देताना जे ठरले ते दोन दिवसात जमा करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ठेकेदारांच्या ग्रुपवर बुधवारी एका सदस्याने मेसेज टाकला आहे. ‘एका पक्षाने आणलेल्या निधीतून ज्यांना कामे मिळालीत त्यांनी, कामे ...

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ठेकेदारांच्या ग्रुपवर बुधवारी एका सदस्याने मेसेज टाकला आहे. ‘एका पक्षाने आणलेल्या निधीतून ज्यांना कामे मिळालीत त्यांनी, कामे घेताना जे ठरले आहे ते दोन दिवसात पूर्ण करावे, जो लवकर पूर्ण करील त्याला पुढील कामे मिळतील. जास्त लांबन लावायचे नाही’, असे हस्तलिखीत पत्र टाकले आहे. ग्रुपवर झालेल्या संवादात काही जणांनी सहमती दर्शविली आहे. काहींनी ओके म्हटले आहे तर एकाने रडणारी इमेज टाकली आहे. एकाने चक्क ‘म्हणजे परत अठरा टक्के’ असा उल्लेख केला आहे.

राज्य शासन वा महानगरपालिकेकडे जमा होणारा निधी सामान्य करदात्याच्या पैशातून आलेला असतो. या पैशाचा योग्य व भ्रष्टाचारमुक्त विनियोग करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची असते. सध्या महानगरपालिका विसर्जित असून, महानगरपालिकेचा कार्यभार प्रशासक यांच्याकडे आहे. त्यामुळे या मेसेजमधून अनेक अर्थ विदीत होत आहेत. सामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणाऱ्या या भ्रष्टाचारामुळे कोणाची घरे भरली जाणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

सुमारे १२ कोटींचा निधी आणला, असा दावा होत असताना त्याचे १८ टक्के म्हणजे सुमारे सव्वा कोटी रुपये इतका पैसा ठेकेदारांकडून कोण काढून घेत आहे ते समजावे. म्हणूनच या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून जे यात गुंतलेले असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, राजू मोरे, दिलीप मैत्रीणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, अजित सूर्यवंशी यांनी दिले.