शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात होणार उपजिल्हा रूग्णालय

By admin | Updated: December 5, 2014 23:39 IST

वेळ व पैशांची बचत

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा येथील ‘मृत्यूंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालय असे विस्तारीकरण करण्यास शासनाच्या आरोग्य विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली असून, यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा आजरा तालुकावासीय रूग्णांच्या दिमतीला राहण्याबरोबरच इमारतीचे विस्तारीकरणही करण्यात येणार असल्याने तालुकावासीय समाधान व्यक्त करीत आहेत.आजरा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (श्रेणी १) डॉ. एस. ए. कुरुंदवाडे यांना आरोग्य विभागाकडून सदर श्रेणीवर्धनाबाबत रीतसर पत्र आले आहे. सद्य:स्थितीला आजरा ग्रामीण रूग्णालयात ३० खाटांची व्यवस्था आहे. बऱ्यापैकी ‘अवघड’ उपचारांकरिता गडहिंग्लज अथवा छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाशिवाय सर्वसामान्य रूग्णांना पर्याय नव्हता; परंतु शासनाच्या या निर्णयाने तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा आजरा येथील उपजिल्हा रूग्णालयात सुसज्ज राहणार आहे. गेल्या पाच वर्षामध्ये ग्रामीण रूग्णालयातून किती रूग्णांनी कोणते उपचार घेतले. रूग्णालयाच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती, वैद्यकीय सेवेची गरज, इत्यादी निकष विचारात घेऊन या रूग्णालयाचे रूपांतरण करण्यात येत आहे. ३० खाटांकरिता २६ कर्मचारी वर्ग, तर ५० खाटांकरिता ४६ कर्मचारी व अधिकारी नेमण्यात येणार आहेत. यामध्ये तब्बल ७ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.वैद्यकीय अधीक्षक, सहायक अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा रक्षक, आदींचाही यामध्ये समावेश राहणार असून, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा तैनात करण्यात येणार आहेत.सद्य:स्थितीला असणाऱ्या गांधीनगर येथील इमारतीच्या विस्तारीकरणास संधी असल्याने मूळ इमारतीचेच विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सदर इमारतीचे नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.वेळ व पैशांची बचतआजरा येथे उपजिल्हा रूग्णालय होणार असल्याने ग्रामीण भागातील रूग्णांचा वेळ व पैसा या दोन्हींची बचत होणार आहे. सध्या गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात माफक दरात उपचार होत असले, तरी प्रवास, जेवण, राहणे याकरिता बराच खर्च करावा लागत असे.अल्पदरात सुविधातज्ज्ञ डॉक्टरांकरवी अत्यल्प दरामध्ये विविध रोगांवर अत्यल्पदरात रूग्णांना सेवा मिळणार आहेत. इ.सी.जी., सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, इत्यादी सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्त्रीरोग तज्ज्ञांची खास नेमणूक होणार आहे.