शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

corona virus In Kolhapur : बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी पुन्हा धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:28 IST

corona virus CprHospital Kolhapur : पीएम केअर फंडातून सीपीआरला मिळालेले आणि सध्या बंद असलेले ४२ व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची पुन्हा धडपड सुरू झाली आहे. पण व्हेंटिलेटर पुरविलेल्या कंपन्या बेपत्ता असल्याने सीपीआर प्रशासनाक़डून पुन्हा एकदा स्थानिक अभियंत्याच्या मदतीने बाजारात साहित्य मिळते का याचा शोध घेतला जात आहे. पीएम केअरमधून व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपन्या बेपत्ता असे लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पुन्हा एकदा बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची धडपड गतिमान झाली आहे.

ठळक मुद्देबंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी पुन्हा धडपड सीपीआर प्रशासन : स्थानिक तंत्रज्ञांची घेणार मदत

कोल्हापूर : पीएम केअर फंडातून सीपीआरला मिळालेले आणि सध्या बंद असलेले ४२ व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची पुन्हा धडपड सुरू झाली आहे. पण व्हेंटिलेटर पुरविलेल्या कंपन्या बेपत्ता असल्याने सीपीआर प्रशासनाक़डून पुन्हा एकदा स्थानिक अभियंत्याच्या मदतीने बाजारात साहित्य मिळते का याचा शोध घेतला जात आहे. पीएम केअरमधून व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपन्या बेपत्ता असे लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पुन्हा एकदा बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची धडपड गतिमान झाली आहे.कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहे. अशा स्थितीत सीपीआरमधील ४२ व्हेंटिलेटर बंद आहेत. हे व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपन्याही बेपत्ता असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हे व्हेंटिलेटर कसे दुुरुस्त करायचा प्रश्न सीपीआर प्रशासनासमोर आहे. कंपन्याकडून दुरूस्तीसाठीचे मार्ग बंद झाल्याने स्थानिक बाजारात साहित्य मिळते का, याचीही चाचपणी सुरू केली आहे. बंद व्हेंटिलेटर विविध वार्डात पडून असल्याने त्यांची विल्हेवाटच लावण्यात येणार आहे.वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळे सुटे भाग घेऊन व्हेंटिलेटर तयार करून ती देण्यात आली आहेत. त्यामुळे कंपन्यांचा शोध घेण्यातही प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. ही व्हेंटिलेटर पुरवताना ती राज्यासाठी ठराविकच कंपन्यांना कंत्राट दिले होते की वेगवेगळ्या याचाही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे कंपन्यांपर्यंत पोहोचणे हेच दिव्य ठरले आहे. प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी व्हेंटिलेटर पुरवली असून त्याच्या दर्जाबद्दल सार्वत्रिक तक्रारी आहेत.

सीपीआरमधील बंद व्हेंटिलेटर दुरूस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारी पातळीवरही पाठपुरावा केला जात आहे. वेळोवेळी कंपन्यांना ई-मेलही पाठवला आहे. पण प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्थानिक पातळीवर साहित्य उपलब्ध झाल्यास बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- एस. एस. मोरे,अधिष्ठाता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर