शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गडकोटांवरील दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी - शिवदुर्ग संवर्धन आंदोलनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले हे प्रेरणास्थान आहेत. तरी या गडकिल्ल्यांवर दारूबंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात ...

कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले हे प्रेरणास्थान आहेत. तरी या गडकिल्ल्यांवर दारूबंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनने केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

नियमाच्या अंमलबजावणीसाठी गडाजवळील तलाठी, ग्रामसेवक, पुरातत्वचे कर्मचारी किंवा वन खात्याचे कर्मचारी, पोलीसपोटील यांच्यामार्फत उपाययोजना राबविण्यात याव्यात, दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष घालावे, अन्यथा शिवभक्तांच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.

यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, अमित आडसुळे, सुशांत हराळे, चैतन्य अष्टेकर, अर्जुन कदम, आदित्य पोवार, किरण चाबुकस्वार, शरद चौगुले, युवराज हळदणकर, प्रणव पाटील, देवेंद्र सावंत, विजय दरबान आदी उपस्थित होते.

--

फोटो नं ०२०२२०२१-कोल-शिवदुर्ग आंदोलन

ओळ :

शिवदुर्ग संवर्धन आंदोलनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना गडकिल्ल्यांवर दारूबंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, अमित आडसुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

--