शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँकेच्या शाखांसमोर संतप्त ग्राहकांचा रास्ता रोको, शाखाधिकाऱ्यांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:56 IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक आॅफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध घातल्याची माहिती कोल्हापूरात समजताच ग्राहकांनी शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेमध्ये गर्दी केली होती. यावेळी ठेवीदारांनी शाखाधिकाऱ्यांना घेराओ घालून शाखेत गोंधळ घातला. बँकेबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देपीएमसी बँकेच्या शाखांसमोर संतप्त ग्राहकांचा रास्ता रोकोकोल्हापूरात शाखाधिकाऱ्यांना घेराओ

कोल्हापूर : मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक आॅफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध घातल्याची माहिती कोल्हापूरात समजताच ग्राहकांनी शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेमध्ये गर्दी केली होती. यावेळी ठेवीदारांनी शाखाधिकाऱ्यांना घेराओ घालून शाखेत गोंधळ घातला. बँकेबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील पीएमसी बँंकेच्या शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेत संतप्त झालेल्या ठेवीदारांनी गोंधळ घातला. यावेळी संतप्त सभासदांनी काहीवेळ रास्ता रोकोही केले. अनेक महिला सभासदांनी रडून गोंधळ घातला. रुईकर कॉलनी येथील शाखेत घुसलेल्या संतप्त ठेवीदारांनी शाखाधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. मात्र, शाखाधिकाºयांनी रिझर्व्ह बँकेने हा निर्बंध घातल्याचे सांगितले, तरी सभासद शांत झाले नव्हते.

पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन अक्टमधील नियम ३५ अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे आॅनलाइन व्यवहारही बंद आहेत. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संबंधित शाखाधिकाऱ्यांनी लोकांना दिली.

रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल. निबंर्धाच्या काळात बँकेला कर्मचाºयांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खर्चासाठीही ठरावीक मर्यादेपर्यंतच रक्कम खर्च करता येणार आहे.

मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत आणि बँकेबाहेर गर्दी करुन आहेत. ग्राहकांनी सकाळपासून बँकेत येऊन चौकशी करण्यास सुरूवात केली होती, त्यामुळे बँकेतून दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली असून, आमचे पैसे कधी मिळणार, अशी विचारणा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बँकेमध्ये वाद सुरू झाले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँकेबाहेर आणि कार्यालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकkolhapurकोल्हापूर