शाहू कॉलेजमध्ये संख्याशास्त्राची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:49+5:302021-02-08T04:21:49+5:30

वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवा कोल्हापूर : रेशन कार्डसाठीची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने ...

Statistics Workshop at Shahu College | शाहू कॉलेजमध्ये संख्याशास्त्राची कार्यशाळा

शाहू कॉलेजमध्ये संख्याशास्त्राची कार्यशाळा

वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवा

कोल्हापूर : रेशन कार्डसाठीची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले. यावेळी ‘लोकराज्य जनता‘चे अध्यक्ष अनिल चव्हाण, अशोक तोरसे, शशिकांत जाधव, अमोल कांबळे, सर्जेराव भोसले, संतोष बिसुरे, बाळासाहेब गवळी, आदी उपस्थित होते.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान

कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘प्रिव्हेंशन ऑफ सेक्सुअल व्हायलन्स’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यामध्ये केईम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या सहयोगाने डॉ. वासुदेव परळीकर, रश्मी चाबूकस्वार यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. वैभवा देसाई, भास्कर पाटील, नृपेशकुमार यांनी व्याख्यान आयोजित केले. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रभारी संचालक प्रा. रवींद्र मराठे यांचे प्रोत्साहन, तर संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर, व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. आर. डी. जाधव यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Statistics Workshop at Shahu College