शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा, जयंती, पंचगंगा प्रदूषणप्रकरणी म्हणणे मांडा; कोल्हापूर सर्किट बेंचची महापालिकेसह शासकीय यंत्रणांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:32 IST

चार आठवड्यांची मुदत, जनहित याचिकेवर सुनावणी

कोल्हापूर : कळंबा तलाव, जयंती नाला (नदी) आणि पंचगंगा नदीच्याप्रदूषणाबद्दल चार आठवड्यांत म्हणणे मांडा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महाराष्ट्र शासन, पर्यावरण व हवामान विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महापालिकेला दिला. सामाजिक कार्यकर्ते सागर प्रकाश घोरपडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या डिव्हिजन बेंचने गुरुवारी (दि. ५) हा आदेश दिल्याची माहिती ॲड. सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.वाढत्या प्रदूषणामुळे कळंबा तलावासह जयंती नाला आणि पंचगंगा नदीच्या काठावरील प्राचीन मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याने नागरिकांच्या धार्मिक भावनांचा अवमान होतो. उद्योगधंदे, हॉस्पिटल, हॉटेल्स यांचे सांडपणी थेट तलावासह नाल्यात आणि पंचगंगा नदीत जात आहे. गंगा नदीच्या धर्तीवर पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन आणि जयंती, कळंबा प्रदूषणमुक्त व्हावा, अशी जनहित याचिका सागर घोरपडे यांनी २३ जानेवारी २०२६ रोजी सर्किट बेंचमध्ये दाखल केली होती.यावर गुरुवारी पहिली सुनावणी झाली. न्यायमूर्ती अवचट आणि न्यायमूर्ती कडेठाणकर यांच्या डिव्हिजन बेंचने ॲड. खोत यांची बाजू ऐकून घेतली. तसेच महाराष्ट्र शासनासह इतर जबाबदार शासकीय यंत्रणांना चार आठवड्यात म्हणणे मांडण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी पाच मार्चला होणार आहे. पत्रकार परिषदेसाठी याचिकाकर्ते घोरपडे उपस्थित होते. ॲड. शिवराम जंगम आणि ॲड. जोतीराम कुंभार यांनी याचिका सादर करण्यात मदत केली.प्राचीन महात्म्य धोक्यातकरवीर महात्म्य या ग्रंथात पंचगंगेसह जयंती नदीचे महत्त्व विषद केले आहे. कात्यायनी मंदिराजवळ उगम पावणाऱ्या जयंती नदीच्या काठावर कात्यायनीसह महादेव, हनुमान, सटवाई, यल्लम्मा, सिद्धिविनायक आणि फुलगुलेश्वर महादेव मंदिर आहे. पंचगंगेच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या सर्व मंदिरांचे प्राचीन महात्म्य धोक्यात आल्याचा मुद्दा ॲड. खोत यांनी सर्किट बेंचमध्ये उपस्थित केला.

याचिकेतील प्रमुख मागण्या

  • कळंबा तलावासह जयंती आणि पंचगंगेत जाणारे सांडपाणी थांबवावे.
  • आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार करावेत.
  • जयंती, पंचगंगेचे पुनरुज्जीवन करावे.
  • कळंबा तलाव आणि पंचगंगा नदी परिसर हेरिटेज व इको सेन्सिटिव्हिटी झोन घोषित करावा.
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Notice issued over Kalamba, Jayanti, Panchganga pollution; explanation sought.

Web Summary : Kolhapur bench directs authorities to address Kalamba, Jayanti, Panchganga pollution within four weeks. Ancient temples' sanctity is threatened. Revival is urged.