शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवड बुद्धिबळ ऑनलाइन स्पर्धा ३ जूनपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

जागतिक बुद्धिबळ संघटनेने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा जुलै २०२१ मध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. त्या ...

जागतिक बुद्धिबळ संघटनेने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा जुलै २०२१ मध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनेही १०, १२, १४ आणि १६, १८ या वयोगटातील मुले, मुली आणि खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा त्याच पद्धतीने १० जूनपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेनेही या स्पर्धा ३ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पर्धेबद्दल माहिती अशी,

एकूण दहा गटांत ही स्पर्धा स्विस लीगच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण ९ फेऱ्यांमध्ये ऑनलाइन टाॅर्नेलो या संकेतस्थळावर होणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धा तीन दिवस सुरू राहणार आहे. रोज तीन फेऱ्याप्रमाणे एकूण नऊ फेऱ्या होणार आहे. तीन ते पाच जूनला १८ वर्षांखालील मुले, मुली, त्यानंतर ६ ते ८ जून दरम्यान सोळा वर्षांखालील मुले-मुली यांच्या स्पर्धा होणार आहेत. यानंतर ९ ते ११ जून ला १४ वर्षांखालील, १२ वर्षांखालील मुले-मुलींच्या स्पर्धा १२ ते १४ जूनला, दहा वर्षांखालील मुले-मुलांच्या स्पर्धा १५ ते १७ जून दरम्यान होणार आहेत. दहा गटातील पहिल्या पंधरा क्रमांकाना रोख बक्षिसे दिली जाणार आहे. बक्षिसांची रक्कम २ लाख ५० हजार इतकी आहे. स्पर्धेचे नोंदणी www.chezzcircle.com/events या संकेतस्थळावर स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बुद्धिबळपटूंनी भरत चौगुले, मनीष मारुलकर यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे करण्यात आले आहे.