शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात १३, १४ ला राज्यस्तरीय हास्ययोग परिषद

By admin | Updated: December 6, 2014 00:32 IST

कोल्हापुरात २५ हास्यक्लब--लाफ्टर क्लब डॉक्युमेंट्री

कोल्हापूर : सहावी राज्यस्तरीय हास्ययोग परिषद १३ व १४ डिसेंबरला कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवारचे अध्यक्ष डॉ. दिलीप शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहा म्हणाले, ही परिषद ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कमध्ये सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यभरातून हास्यक्लबचे सदस्य येणार आहेत. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे उपस्थित राहणार आहेत. येथील सर्व हास्य क्लबच्यावतीने परिषदेचे संयोजन केले आहे. कोल्हापुरात प्रथमच होणाऱ्या या हास्य परिषदेत डॉ. मदन कटारिया, माधुरी कटारिया, हास्ययोगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे, पुण्याचे मानसोपचारतज्ज्ञ चिंतामणी कुलकर्णी, पुण्याचे डॉ. शिरीष गुजर, महाराष्ट्र हास्ययोग संघाचे अध्यक्ष सुषमा दुगड, पुण्याचे विठ्ठल काटे, डॉ. सुभाष देसाई, मकरंद टिल्लू, ठाण्याचे माधव मस्के, हास्यगुरू कमलेश मसालेवाला, आदी मार्गदर्शन करणार आहेत. हास्य स्पर्धा, हास्य दिंडी, हास्य व डान्स मेडिटेशन होणार आहे. नावनोंदणी यापूर्वीच झाली आहे. मात्र, १४ डिसेंबरला सायंकाळी होणाऱ्या डॉ. मदन कटारिया यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्वांना घेता येईल. यावेळी उपाध्यक्ष एन. पी. मदने, सचिव पी. एम. देशपांडे, ज्ञानेश्वर भस्मे, सी. एम. पारेख, दिलीप कोण्णूर, डी. टी. चौधरी, प्रफुल्ल महाजन, शिवकुमार हिरेमठ, एल. एस. पाटोळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापुरात २५ हास्यक्लबफिजिशियन असलेल्या डॉ. कटारिया यांनी जगातला पहिला हास्य क्लब १३ एप्रिल १९९५ मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये सुरू केला. त्यांनी हास्य चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतले असून, बंगलोरमध्ये हास्ययोग युनिव्हर्सिटी सुरू केली आहे. देशात सध्या जवळपास दहा हजार हास्यक्लब आहेत. कोल्हापुरात डॉ. धनंजय गुंडे यांनी २० जानेवारी १९९८ मध्ये पहिला हास्यक्लब सुरू केला. आता शहरात २५ व जिल्ह्यात ४५ हास्यक्लब कार्यरत असून, आणखी शाखा निर्माण होत आहेत. लाफ्टर क्लब डॉक्युमेंट्रीनील डेवेन पोट्र या निर्मात्याने कोल्हापूर, पेठवडगांव, इचलकरंजी, सांगली, पुणे, चंदीगड येथे व परदेशात चित्रीकरण करून लाफ्ट क्लब नावाची एक तासाची डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्याचा वर्ल्ड प्रीमियर या परिषदेत केला जाणार आहे.