शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘राज्य नाट्य’चा समारोपही हाऊसफुल्ल

By admin | Updated: December 5, 2014 00:21 IST

या स्पर्धेत एकूण सतरा संघांची नाटके सादर झाली

कोल्हापूर : गेल्या सतरा दिवसांपासून मायबाप रसिक प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणाऱ्या ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आज, गुरुवारी रसिकांच्या मांदियाळीत समारोप झाला. दुपारी साडेबाराची वेळ असतानाही सभागृहातील गर्दी प्रेक्षकांच्या दर्दीपणाचेच द्योतक आहे. हौशी रंगभूमी चळवळीला लोकाश्रय मिळत नाही, हा निराशावादी सूर आता विरून गेला आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित व शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या स्पर्धेत एकूण सतरा संघांची नाटके सादर झाली. त्यात कोल्हापूरसह इचलकरंजी, कणकवली, सिंधुदुर्ग, बेळगाव येथील नाट्यसंस्थांचाही सहभाग होता. शाहू स्मारक भवनची आसनक्षमताच मर्यादित असल्याने सभागृह भरलेले दिसत असले तरी सतरा दिवस यात सातत्य असणे हीदेखील महत्त्वाची गोष्ट होती. काही सुगुण, हनुमान, वरेरकर.. अशा पाच-सहा नाटकांना तर हॉलमध्ये उभे राहायलादेखील जागा नव्हती. प्रेक्षकांनी खाली बसून व बाहेर उभे राहून नाटकांचा आस्वाद घेतला. यावरून त्यांच्या अभिरुचीची कल्पना येते. आज बेळगावमधील वरेरकर नाट्य संस्थेने ‘वेडिंग अल्बम’ हे नाटक सादर केले. शाहू स्मारकच्या अनुपलब्धतेमुळे या नाटकाची वेळ दुपारी साडेबारा ठेवण्यात आली होती. तरीही हॉल प्रेक्षकांनी भरून वाहत होता. कोल्हापूरच्या हौशी रंगभूमीला आलेली मरगळ ‘राज्य नाट्य’ने दूर केली; तर यंदा दर्जेदार नाटके आणि रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद यांमुळे कोल्हापूरचे गतवैभव परत मिळण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.स्पर्धेची वेळ संध्याकाळी सातराज्य नाट्य स्पर्धा अन्य सर्व केंद्रांवर संध्याकाळी सात वाजता सुरू होते. कोल्हापुरात मात्र प्रेक्षकांचा अनुभवावरून रात्री साडेआठची वेळ ठेवली. मात्र, लांब राहणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी नाटके पाहायला येणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे नाटकांची वेळ संध्याकाळी सात किंवा साडेसातची असावी, अशी मागणी रसिकांनी व नाट्यक्षेत्राशी निगडित व्यक्ती व संस्थांनी संयोजकांकडे केली. संयोजन समितीतील प्रशांत जोशी यांनीही वेळ बदलण्यात येईल, असे सांगितले.