यात किशोर गटाची ५ ते ८ मार्च दरम्यान जळगावला , तर कुमार गटाची १६ ते १९ मार्च दरम्यान सांगलीला व पुरुष व महिला खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा १ ते ४ एप्रिल दरम्यान सिन्नर (नाशिक) येथे होणार आहे. कुमार गटातील खेळाडूंसाठी ३१ मार्च २००१ किंवा त्यानंतरचा आणि किशोर गटासाठी ३१ मार्च २००५ किंवा त्यानंतरचा जन्म व वजनाचा निकष निर्धारित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील यांनी दिली. आता जिल्हावार निवड चाचणी स्पर्धा होऊन राज्य स्पर्धेसाठी संघ पाठविले जाणार आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}चौकट
कुमार गटासाठी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने गुडाळेश्वर क्रीडा मंडळ, गुडाळ, तर किशोर गटासाठी महागावचा कबड्डी संघ निवड चाचणीतून स्पर्धेसाठी निवडला आहे.