शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ताराराणी आघाडीला एक चिन्ह मिळणारचं

By admin | Updated: October 9, 2015 00:42 IST

सुनील मोदी : विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे काम

कोल्हापूर : ताराराणी आघाडी पक्षाला एक चिन्ह मिळणारच नाही, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. परंतु, यामध्ये तथ्य नसून ‘ताराराणी’ हा नोंदणीकृत पक्ष असल्याने एक चिन्ह मिळणारचं आहे, असे स्पष्टीकरण ताराराणी आघाडी पक्षाचे निमंत्रक सुनील मोदी यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत केले. १७ आॅक्टोबरला चिन्ह वाटपादिवशी हे एकच चिन्ह मिळेल. मात्र, ते कोणते हे आताच सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.मोदी म्हणाले, ताराराणी आघाडी पक्षाची २००९ मध्ये नोंदणी झाली असून, हा एक नोंदणीकृत पक्ष आहे. राज्यात २२८ नोंदणीकृत पक्ष असून, त्यामधील ‘ताराराणी’ हा एक आहे. त्यामुळे नोंदणीकृत पक्षाला जे नियम लागू आहेत, ते सर्व नियम या पक्षालाही लागू आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर पक्षांना चिन्हे वाटण्याचे काही प्रमाण आहे. यामध्ये प्राधान्याने राष्ट्रीय पक्षांचे आरक्षित चिन्ह आहे ते त्यांना द्यावयाचे आहे. त्यानंतर जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना जे आरक्षित चिन्ह आहे, ते त्यांना द्यावयाचे आहे. त्यानंतर नोंदणीकृत पक्षाला चिन्ह द्यावयाचे आहे. मोदी पुढे म्हणाले, नोंदणीकृत पक्षांना कोणतेही चिन्ह आरक्षित ठेवण्याची तरतूद नाही. ते ज्या-त्या निवडणुकीवेळी घ्यावे लागते. त्यामुळे चिन्हे वाटपादिवशीच एक चिन्ह मिळणार आहे. आम्ही दोन महिन्यांपूर्वी पक्षाला एक चिन्ह द्यावे, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु, ती न मिळाल्याने उच्च न्यायालयात गेलो होतो. त्यानुसार तेथे आता लगेच एक चिन्ह देणे शक्य नाही. परंतु, चिन्ह वाटपादिवशी तुम्हाला एक चिन्ह मिळू शकते, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी एकच चिन्ह मागण्यामागे उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सोयीचे झाले असते, असा हेतू होता. विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू असून त्यामध्ये तथ्य नाही. (प्रतिनिधी)३८ जागांवर ‘ताराराणी’चे एकच चिन्हताराराणी आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून, भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पक्षाला स्वतंत्रपणे एक चिन्ह मिळेल, असे सांगून मोदी यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला. त्यामध्ये भाजप ३८, ताराराणी आघाडी ३८, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) २ अशा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे.