शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्टार १२१६: चालणे विसरले, नको त्या वयात आजारांनी जखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर: चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, हे कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हातात गाडी आल्यापासून लोक चालणेच विसरले ...

कोल्हापूर: चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, हे कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हातात गाडी आल्यापासून लोक चालणेच विसरले आहेत, त्याचे व्हायचे तेच परिणाम दिसत आहेत. नको त्या वयात हाडांची दुखणी शरीराला जखडली आहेत. हातापायांना व्यायामच नसल्याने स्थूलता वाढून अस्थिराेगांना आयते निमंत्रणच मिळत आहे.

अलीकडे हातात दुचाक्यांचे हॅण्डल आणि चारचाकीचे स्टेअरिंग आल्यापासून किक आणि स्टार्टर मारण्यापर्यंतच हातापायांची हालचाल सीमित राहिली आहे. जे आरोग्यादृष्टीने जागरूक आहे, ते भल्या पहाटे आणि संध्याकाळी सायकलिंगसह वेगाने चालण्याचे व्यायाम करतात. पण त्यांची एकूणच संख्या पाहता बरीच मोठी लाेकसंख्या मिळणारा रिकामा वेळ एक तर टीव्ही पाहण्यात, झोपण्यात, गप्पा मारण्यात घालवताना दिसते. जेवणे आणि झोपणे यातून नुसताच स्थूलपणा वाढत आहे. मग जाड झाला आहे, असे कुणी म्हटले की फिरायला जाण्याचे, व्यायाम करण्याचे संकल्प सोडले जातात, पण तेही नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे लगेचच बंद पडतात. लठ्ठपणा आहे तसाच राहतो. कमी अधिक प्रमाणात समाजातील सर्वच घटकांत हे चित्र आहे. लठ्ठपणा वाढल्याने साहजिकच त्याचा ताण एकूण शरीरावर येतो. शरीराच्या सर्वच हालचाली मंदावतात. यातून हाडांची दुखणे डोके वर काढू लागतात. हाडांमध्ये मजबुती राहत नाही, त्यामुळे साधा पाय मुरगळला तरी ते फॅक्चरपर्यंत जात आहे, आणि त्याच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

याच कारणासाठी होतेय चालणे

ज्येष्ठ नागरिक : व्यायाम म्हणून सकाळ व संध्याकाळ

महिला: किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा, बसस्टॉपपर्यंत

पुरुष: गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत

तरुणाई: गल्लीतील मित्रमैत्रिणींच्या घरापर्यंत

म्हणून वाढले हाडांचे आजार

हाडे ठिसूळ होणे हा चालणेच बंद केल्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. पूर्वी वाहतुकीची साधने नसल्याने लोक पायी चालायचे. त्यामुळे त्यांना हाडांचे दुखणेही नसायचे, ते दीर्घायुष्यीदेखील असायचे, पण आता हातात गाडीची चावी आल्यापासून वेळ वाचतोय पण बहुमूल्य आरोग्य वाया जात आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. पायाच्या पिंडऱ्या या शरीरातील दुसरे हृदय असतात, त्या जितक्या मजबूत तितके हृदयाचे रक्ताभिसरण वाढून रक्ताचा दाब कमी होतो. स्नायू बळकट होतात. शरीरावरील ताण कमी होतो.

डॉ. अतुल्य पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ, दुधाळी, कोल्हापूर

हे करुन पाहा

राेज सकाळ संध्याकाळ वॉकिंग, जॉगिंगला कंटाळा नको

किमान एक किलोमीटरच्या परिसरात काम असेल तर चालत जाणे

पहिल्या दोन मजल्यांसाठी लिफ्टचा वापर शक्यतो टाळा

बाजारातही भाजी खरेदीसाठी शक्यतो चालतच फिरावे

दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर वाढवावा

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्याेना सायकल सक्तीचीच करावी

लहान मुलांना सक्तीने चालण्यास प्रवृत्त करावे

गृहिणीनी घरातील जिन्यावरुनच चढउतार करावा

पायी चालणे शक्यच नाही त्यांच्यासाठी हे करता येईल

शक्य असेल तितके चालणे महत्त्वाचे आहे, तरीदेखील शक्य नसेल तर बसल्या जागेवर हातापायांची हालचाल करता येणारे व्यायाम करावेत, घरातल्या घरात चालण्याचा प्रयत्न करावा.