दुसऱ्या डोससाठी उद्या विशेष सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST2021-09-03T04:25:51+5:302021-09-03T04:25:51+5:30

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. म्हणूनच उद्या शनिवारी ४ सप्टेंबर ...

Special session tomorrow for the second dose | दुसऱ्या डोससाठी उद्या विशेष सत्र

दुसऱ्या डोससाठी उद्या विशेष सत्र

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. म्हणूनच उद्या शनिवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जानेवारीपासून लसीकरण सुरू असले तरी दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या डोसची मुदत संपू नये यासाठीच शनिवारी या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरा डोस शिल्लक असलेल्या नागरिकांनी थेट जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीमध्ये जाऊन आपला दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आला आहे.

Web Title: Special session tomorrow for the second dose