शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

छापा पडताच तरुणाने घेतली नदीत उडी

By admin | Updated: January 21, 2015 23:50 IST

तरुण बेपत्ता : मिरजेत जुगार खेळताना पोलिसांचा छापा

मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीपात्रात आयुब इब्राहीम बेपारी (तारळेकर, वय ४०, रा. अत्तार गल्ली, मिरज) हा तरूण बेपत्ता झाला आहे. नदीघाटावर मंदिराशेजारी आयुब व त्याचे मित्र जुगार खेळत असताना अचानक पोलिसांचा छापा पडल्याने, पळून जाण्याच्या प्रयत्नात आयुब बेपारी हा नदीत पडल्याचा संशय आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात बेपत्ता आयुब बेपारी याचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. मात्र तो सापडला नसल्याने उद्या सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे. आज दुपारी आयुब बेपारी व त्याचे चार मित्र नदीकाठी कृष्णा घाटावरील मार्कंडेश्वर मंदिराशेजारी निर्जन जागेत पत्त्यांचा जुगार खेळत होते. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तीन पोलीस कर्मचारी तेथे गेले. पोलिसांना पाहून जुगार खेळणाऱ्यांची पळापळ झाली. आयुबचे चार मित्र पळून गेले, मात्र आयुब पळून जाताना नदीपात्रात बेपत्ता झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी नदीच्या पलीकडच्या काठावर जाऊन आयुबचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. आयुब नदीत बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नगरसेवक मैनुद्दीन बागवान, आयुबचे नातेवाईक व बोकड चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कृष्णा घाटावर आले. त्यांनी तब्बल तीन तास पोलीस व स्थानिक नागरिकांसोबत नदीपात्रात आयुबचा शोध घेतला. नदीपात्रात पाण्याची पातळी कमी आहे. मात्र जॅकवेलजवळ नदीचे पात्र खोल असल्याने तेथे आयुब बुडाल्याच्या संशयाने शोधमोहीम सुरू होती. मात्र आयुब सापडला नसल्याने, तो नदीपात्रात बुडाला की पळून गेला, याबाबत संभ्रम होता. नदीकाठाशेजारी जुगाराचे साहित्य, आयुबचा मोबाईल, चप्पल सापडले आहेत. मात्र आयुब सापडत नसल्याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक हवालदिल आहेत. आज सायंकाळी थांबविण्यात आलेली शोधमोहीम उद्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयुब हा जनावरांच्या मांस विक्रीचा व्यवसाय करतो. मांस विक्री बंद आंदोलन सुरू असल्याने आयुब याच्यासह अन्य मांस विक्रेते आज दुपारी कृष्णाघाटावर गेले होते. तेथे त्यांचा पत्त्यांचा जुगार चालू असताना हा प्रकार घडला. (वार्ताहर)पत्त्यांचा जुगार अदखलपात्र गुन्हापोलीस कारवाईच्या भीतीमुळे जुगार खेळणाऱ्यांची पळापळ होते. जुगार खेळणाऱ्यांकडून चिरीमिरी मिळत असल्याने पोलीसही जुगार खेळणाऱ्यांना पकडण्यासाठी उत्साहाने धावतात. आज मात्र जुगाराच्या छाप्यावेळी आयुब नदीत पडल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. आयुबला पोहता येत असतानाही तो गायब झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.