शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित-आईचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी मुलगा दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने ...

कोल्हापूर : कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सुनील रामा कुचकोरवी यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोषी ठरवले. मंगळवारी (दि.६) शिक्षेविषयी सुनावणी होणार आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळा नाका परिसरातील अग्निशामक केंद्राच्या मागील वसाहतीमध्ये २८ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास संशयित सुनील याने आपली आई यल्लवा रामा कुचकोरवी (वय ६२) हिला दारू पिण्यास पैसे देत नाही. या कारणावरून चाकू, सुरी, सत्तूर अशा प्राणघातक हत्यारांनी खून केला होता. शेजाऱ्यांना चाहूल लागल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असता लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात संशयिताविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने सुनील याला दोषी ठरवले असून मंगळवारी (दि.६) शिक्षा जाहीर केली जाणार आहे. उभय पक्षांच्या तक्रारी ऐकून शिक्षा सुनावली जाणार आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक यांनी मदत केली.