शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगाव पालिका बसविणार सौर ऊर्जा युनिट

By admin | Updated: December 5, 2014 00:21 IST

सभेत निर्णय : दरमहा होणार दोन लाख रुपयांची वीज बचत

पेठवडगाव : वीज बचाव मोहिमेंतर्गत सोलर युनिटद्वारे कार्यालय व पथदीप कार्यान्वित करून दरमहा दोन लाख रुपयांची बचत करण्याचा निर्णय पेठवडगाव पालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, विकासकामात दिरंगाई केल्याबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. स्वच्छतेविषयक सूचना देऊनही कामे होत नसल्याची बोचरी टीका यावेळी झाली.नगरपालिकेच्या सभेत विविध १६ विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विद्या पोळ होत्या.पालिकेच्या इमारतीवर सोलर युनिट आणि स्ट्रीट लाईटवर लीड बल्ब बसविण्यात येणार आहेत. सौर ऊर्जा युनिटमुळे महिन्याला ५७ हजारांची, तर स्ट्रीट लाईटची ७० ते ८० हजार रुपयांची बचत होणार आहे. नगराध्यक्षा पोळ म्हणाल्या, एस. टी. स्टँड समोरील खासगी जागेत बांधकामाचा पाया काढला आहे. हे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे तिथे पाणी साठले असून, त्यामध्ये मेडिकलसह अन्य कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे संबंधित जागा मालकावर कारवाईची मागणी त्यांनी केली. उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी खड्ड्यांचा प्रश्न मांडला. स्टँडजवळ गटारीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडले जाते. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा मांडला.रंगराव पाटील यांनी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व टेंडरप्रमाणे करावीत, असा आग्रह धरला. संतोष गाताडे यांनी सावर्डेकर ते चिंगळे गल्ली रस्त्याचे काम दर्जेदार होत नसल्याचा आरोप केला. याबाबत नोटिसा काढल्या असून कारवाई करणार असल्याचा खुलासा प्रशासनाने केला. त्याला सर्वच नगरसेवकांनी विरोध करून ठोस कृती करण्याचा सल्ला प्रशासनास दिला.पालिकेतील पाणपोईच्या जागी पोलीस चौकी करणे, यासह विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी विजयसिंह यादव, राजू देवस्थळी, सुनील हुकेरी, अभिजित पोळ, गीता कोरे, निर्मला सावर्डेकर, ऊर्मिला उडाळे, आदींनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)५पिता-मुलगीचा सत्कारशिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर तसेच ‘लोकमत’ आयकॉनपदी निवड झाल्याबद्दल नराध्यक्षा विद्या पोळ व नगरसेवक विजयसिंह यादव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.