ध्येयवेड्या बाबुराव मोरेंसारख्या व्यक्तीची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:10+5:302021-04-04T04:24:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : येथील मौनी महाराज (बनारस) हायस्कूलचे शिक्षक बाबुराव मोरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या ...

Society needs a man like Dhyayvedya Baburao Moren | ध्येयवेड्या बाबुराव मोरेंसारख्या व्यक्तीची समाजाला गरज

ध्येयवेड्या बाबुराव मोरेंसारख्या व्यक्तीची समाजाला गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी : येथील मौनी महाराज (बनारस) हायस्कूलचे शिक्षक बाबुराव मोरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी विजयराव घोलपे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवृत्त शिक्षक मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

विजयराव घोलपे म्हणाले, समाजासाठी वाहून घेतलेल्या व सामाजिक पिंड असणाऱ्या ध्येयवेड्या बाबुराव मोरे यांच्यासारख्या कुटुंबवत्सल, नि:स्वार्थी व्यक्तींची विद्यार्थ्यांना, शाळांना व समाजाला गरज असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोरे यांचा सपत्नीक सत्कार झाला. स्वागत व प्रास्ताविक एम. आर. पाडळकर यांनी केले. कार्यक्रमात मुख्याध्यापक एन. जी. कांबळे, प्रा. विजयमला घोलपे, एस. एम. खेगडे, मोरे, शिवाजी वळीवडे, कुंभार, ॲड. सुशांत मोरे, एच. बी. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनीता मोरे, डी. बी. कदम, डी. डी. देवाळे, व्ही. एस. मोरे, बरगे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. जी. कांबळे यांनी केले तर एस. डी. देसाई यांनी आभार मानले.

-

फोटो ०३ गारगोटी बाबूराव मोरे

:

गारगोटी : येथे बाबुराव मोरे यांच्या सत्कारप्रसंगी विजयराव घोलपे, डी. डी. देवाळे, व्ही. एस. मोरे, एन. जी. कांबळे, बरगे उपस्थित होते.

Web Title: Society needs a man like Dhyayvedya Baburao Moren